आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्पिताच्या रिसेप्शनमध्ये सामील होण्यासाठी हेलिकॉप्टरने मंडीला येणार सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला- हिमाचलच्या मंडि जिल्ह्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोमवारी रात्री (25 मे) लोकांची भेट घेणार आहे. बहीण अर्पिताचे सासर मंडि शहरात पहिल्यांदा येऊन सलमान आयुष आणि अर्पिता यांच्या रिसेप्शनमध्ये सामील होणार आहे. याच्या पूर्वी तयारीसाठी माजी मंत्री पंडित सुखराम यांचे कुटुंबीय व्यस्त झाले आहेत. सलमान खान हेलिकाफ्टरने मंडिला पोहोचणार आहे. त्याच्या हेलिकाफ्टर लँडिंगसाठी सुंदरनगर आणि भुंतर ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. येथून तो रस्त्याने मंडिला रवाना होईल.
हिमाचल संस्कृतीची ओळख करून घेणार-
सलमानच्या स्वागतासाठी पड्डलमध्ये हिमाचल सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मंडियाली आणि डोंगराळ भारातील वाद्य आणि नृत्य सादर केले आहे. जिमखाना क्लबमध्ये लंचनंतर सलमान खान शहरात असलेल्या अनिल शर्मा यांच्या पॉम रिसॉर्टमध्ये थांबणार आहे.
पड्डलमध्ये लोकांची घेणार भेट-
सलमान एक ते दोनच्या मध्ये मंडिमध्ये पोहोचेल. सलमान पड्डल स्टेडिअमपासून जवळपास अर्धा तास लोकांची भेट घेईल. पड्डल स्टेडिअमच्या जवळच असलेल्या जिमखाना क्लबमध्ये आयुष-अर्पिताच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. स्टेडिअममध्ये सलमान खान लोकांचे अभिवादन स्वीकार करेल.
26 मे रोजी मुंबईला परतणार-
लग्नाच्या सात महिन्यानंतर पंचायत राज मंत्री अनिल शर्मा आणि सुनीता शर्मा यांची सून अर्पिता रविवारी (24 मे) पहिल्यांदा सासरी मंडि येथे जाणार आहे. अर्पिता-आयुष यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये मुंबईहून अनिल शर्मा यांचे व्याही खान कुटुंबीय मंडिमध्ये पोहोचतील. तसेच सलमान बहीण अर्पिताच्या घरी सोमवारी पोहोचणार आहे. सलमान 25 मेला मंडी पोहोचणार आणि सहपरिवार 26 मे रोजी मुंबईला परतणार आहे.
मंडिमधील पाहूणे-
सलमान आता केवळ माझाच नव्हे मंडिचा पाहूणा आणि नातेवाईक झाला आहे. मंडीच्या नागरिकांना विनंती आहे, की या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी सहकार्य करावे. जाणेकरून सलमान वारंवार मंडीला येईल.
- अनिल शर्मा, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयुष-अर्पिताच्या लग्नाचे फोटो...