आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अनेक रेकॉर्ड मोडित काढल्यानंतर 'सुल्तान'चे नवीन गाणे रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खान स्टारर 'सुल्तान' सिनेमा रिलीज होऊन सात दिवस उलटून गेले. या सात दिवसांत सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे. सोबत 35 रेकॉर्ड मोडित काढण्यातही यश मिळवले आहे. आज सलमानने सिनेमाचे आणखी एक गाणे रिलीज केले आहे. 'सच्ची मुच्ची' बोल असलेल्या या गाण्याला मोहित चौहान, हर्षदीप कौरने आवाज दिला आहे. हे गाणे सलमानने सोशल साइट टि्वटरवर रिलीज केले आहे.
रिलीज झालेल्या या गाण्यात सिनेमातील काही सीन दाखवण्यात आले आहेत. त्यात अनुष्का शर्मा आणि सलमान खान रेसलिंग करताना दिसत आहेत. तसेच दोघांनी रोमँटिक केमिस्ट्रीसुध्दा गाण्यात दिसून येते. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 6 जुलैला रिलीज झालेला हा सिनेमा अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली सिनेमा निर्मित करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान-अनुष्काची गाण्यातील झलक...शेवटी पाहा गाण्याचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...