आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Reprises His 'Bajrangi Bhaijaan' Role In Real Life

ख-या आयुष्यात सलमान झाला 'बजरंगी...', रनवे किड्सना पोहोचवले घरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बजरंगी भाईजान' सिनेमात मुन्नीला तिच्या कुटुंबीयांना भेटवणारा सलमान खान रिअल लाइफमध्येसुध्दा असच काही काम करत आहे.
सोमवारी (17 ऑगस्ट) संध्याकाळी सलमानने आपले रिअल बजरंगीचे रुप दाखवले. त्याने चार अल्पवयीन मुलांना आपल्या कुटुंबीयांशी भेटवले. हे चारही मुले घरातून पळून आले होते आणि त्यांना पुन्हा घरी जायचे होते.
सलमानला जेव्हा याविषयी माहित झाले तेव्हा त्याने त्यांची मदत करण्यास सुरुवात केली. हे काम त्याने मुंबईच्या अंतरा देसाईच्या सहकार्याने केले. अंतरा एक कंपनी चालवते, त्यामाध्यमातून ती सेलिब्रिटींना विविध चॅरिटेबल कॅम्पेनशी जोडते.
ती सांगतेल, 'सिनेमा प्रभाव खूप दिसतोय आणि सलमानसुध्दा मुलांच्या या प्रकरणात रुची दाखवत आहे. या चार मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पाठवण्याचा सर्व खर्च त्याने उचलला. त्यामध्ये मुलांच्या कुटुंबीयांचे करजातपर्यंत येणे जाणे आणि इतर खर्च सामील आहे.'
सोबतच तो चारही मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी सहकार्य करत आहे. सोमवारी संध्याकाळी चारही मुलांना त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले. या चौघांचे वय 11 ते 16मध्ये होते.
अंतराने सांगितले, 'सोमवारी करजतमध्ये हे री-यूनिअन झाले. यावेळी सलमान खूप भावूक झाला होता. मुलांना तर माहितदेखील नव्हते ते सलमानला भेटणार आहेत आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना घेण्यासाठी येणार आहेत.'
आमचा हा उपक्रम पुढेदेखील असाच सुरु राहणार आहे. पुढील काही दिवसांत आम्ही आणखी काही मुलांना त्यांच्या घरच्यांशी भेटवणार आहोत. या उपक्रमांशी सलमानसुध्दा जुवळलेला राहिल.