Home »News» Salman Khan Revealed On His Marriage

लग्नाबद्दल सलमान खानने केला हा खुलासा, म्हणाला- मी खूश आहे

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 17:08 PM IST

  • लग्नाच्या प्रस्नावर सलमानने मी खूश असल्याचे सांगितले.
सलमान खानची बहुचर्चित फिल्म 'टायगर जिंदा है'चा ट्रेलर रिलीज झाला असून जगभरात यू-ट्यूबवर तो सर्वाधिक पाहिला जात आहे. 'टायगर जिंदा है' सोबतच सलमान सध्या रेस-3 मुळेही चर्चेत आहे. चित्रपटांशिवाय आणखी एक कारण आहे ज्यामुळे सलमान नेहमी चर्चेत असतो. ते म्हणजे सलमानचे लग्न. एका मुलाखतीत त्याने पुन्हा एकदा या त्याच्या लग्नाच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
लोकांना माझ्या लग्नाची जास्त चिंता...
लग्नाच्या प्रश्नावर सलमान म्हणाला, 'माझ्याकडे याचे कोणतेच उत्तर नाही. मात्र मी आनंदी आहे की खूप लोक आहेत ज्यांना माझ्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे. मला प्रश्न पडतो की माझ्या लग्नाने यांचा काय फायदा होणार आहे. दुसरे, असे की माझे लग्न केव्हा होणार होणार की नाही होणार हे मला काहीच माहित नाही. मात्र मी खूश आहे. इनफॅक्ट खूप खूश आहे.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, टायगर जिंदा है बद्दल...

Next Article

Recommended