आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान म्हणाला, 'सुल्तान'च्या सेटवर अंडरविअरमध्ये कॅमेरा लपवून नेत होते लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रमोशनल इव्हेंटदरम्यान सलमान खान आणि अनुष्का शर्मा - Divya Marathi
प्रमोशनल इव्हेंटदरम्यान सलमान खान आणि अनुष्का शर्मा
मुंबई: दिग्दर्शक अली अब्बास जफरचा 'सुल्तान' सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. शनिवारी (18 जून) सिनेमाची मुख्य जोडी सलमान खान आणि अनुष्का शर्मा प्रमोशन करताना दिसले. त्यादरम्यान सलमानने सांगितले, की कसे ज्यूनिअर आर्टिस्ट शूटिंगदरम्यान सेटवर फोटो लीक करत होते. त्याच्या सांगण्यानुसार, 'लोक अंडविअरमध्ये कॅमेरा लपून सेटवर घेऊन जात होते.'
काय म्हणाला सलमान...
सलमान म्हणाला, 'सेटवर लोकांना सांगितले जात होते, की कुणीच कॅमेरा वापरायचा नाही. परंतु ज्यूनिअर आर्टिस्ट अंडविअरमध्ये मोबाईल कॅमेरा लपवून फोटो क्लिक करत होते आणि लीक करत होते. सिनेमाचे फोटो लीक झाल्यानंतर खूप वाईट वाटायचे. परंतु काय करणार.'
7 जुलैला रिलीज होणा-या या सिनेमाचा ट्रेलर, तीन गाणी आणि अनेक पोस्टर्स समोर आले आहेत. परंतु यापूर्वी शूटिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंग सेटवरील फोटो...
बातम्या आणखी आहेत...