आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सुल्तान\'मधून गाणे काढल्यावर सलमान म्हणाला, \'कोण आहे अरिजीत?\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानने शनिवारी 'सुल्तान'ची प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. त्यादरम्यान अरिजीतशी संबंधित काहीवर त्याने उत्तरे दिली. - Divya Marathi
सलमानने शनिवारी 'सुल्तान'ची प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. त्यादरम्यान अरिजीतशी संबंधित काहीवर त्याने उत्तरे दिली.
मुंबई: 'सुल्तान' सिनेमातील एका गाण्यावर सुरु असलेल्या वादात नवीन वळण आले आहे. कथितरित्या हे गाणे आधी गायक अरिजीत सिंह गाणार होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या सांगण्यावरून हे गाणे अरिजीतकडून हिसकावून राहत फतेह अली खानला देण्यात आले. परंतु सलमाननच्या सांगण्यानुसार, तो अरिजीत सिंहला ओळखत नाही. शनिवारी तो आणि अनुष्का 'सुल्तान'च्या पत्रकार परिषदेत आले होते.
काय म्हणाला सलमान...
- सलमानला अरिजीतचे गाणे काढण्याच्या गोष्टीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान म्हणाला, 'अरिजीत कोण आहे? मी नाही ओळखत. हा गायक आहे?'
- सलमान पुढे म्हणाला, 'अनेक सिनेमांत गायक रिप्लेस केले जातात. लोक येतात आणि गाऊन निघून जातात. दिग्दर्शक आणि निर्माता ठरवतो, कुणाला ठेवायचे. माझा आवाजसुध्दा एकदा रिजेक्ट करण्यात आला होता. त्यामुळे कुणी अपसेट होण्याची गरज नाहीये.'
- सलमानला अरिजीत सिंहच्या फेसबुकवर लिहिलेल्या माफीनाम्याविषयी विचारल्यानंतर तो म्हणाला, 'त्या स्मार्ट कमेंट्स आणि पोस्ट्सने स्पष्ट दिसतय, की त्याचा हेतू काय आहे.'
काय आहे प्रकरण?
- गिल्ड अवॉर्ड (फेब्रुवारी 2014) सोहळ्यात अरिजीत सिंहला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता.
- तो कार्यक्रम सलमान होस्ट करत होता. अरिजीत स्टेजवर आल्यानंतर सलमान त्याला
म्हणाला होता, 'झोपला होतास का?'
- यावर अरिजीत म्हणाला होता, 'तुमच्या (सलमान आणि रितेश देशमुख) होस्टिंगने मला झोप आली.'
- सलमान चिडला आणि म्हणाला, 'तू जशी गाणी गातोस, त्याने झोप तर येणारच.'
- त्यानंतर सलमानने अरिजीतला 'तुम ही हो...' गाणे गायला सांगितले. अरिजीत गायला लागल्यानंतर सलमान त्याची नकल काढायला लागला.
- सलमान अरिजीतला म्हणाला, 'हा घे तुझा अवॉर्ड आणि आता जा.' यादरम्यान दोघे अपसेट दिसले होते.
काय लिहिले अरिजीतने...
- अरिजीतने लिहिले, 'डिअर मिस्टर सलमान खान. हा शेवटचा प्रयत्न आहे, ज्याच्या माध्यमातून मी तुझ्याशी बोलू शकतो. मी तुला अनेकदा मेसेज आणि फोन केले. तुझा गैरसमज झाला आहे, की मी तुझी प्रतिमा मलिन केली. त्या शोदरम्यान जे काही झाले ते चुकीच्या वेळी झाले आहे.'
- 'जर तुला वाटते आहे, की माझ्याकडून चुकी झाली आहे किंवा मी तुझा अपमान केला आहे तर मी तुझी मनापासून माफी मागतो. मी आणि माझे कुटुंबीय नेहमीच तुझे चाहते राहिलो आहोत.'
- 'मी तुझ्यासोबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मी माफी मागितली, परंतु तू काहीच उत्तर दिले नाही. मी अनेकदा माफीचे मेसेज पाठवले. हे तुलाही माहिती आहे.'
- 'नीता यांच्या येथे मी माफी मागण्यासाठी आले होते. परंतु तू त्याचेही उत्तर दिले नाही. परंतु काहीच अडचण नाहीये. मी तुझी सर्वांसमोर माफी मागतो. तुला विनंती आहे, की मी तुझ्या 'सुल्तान'मध्ये जे गाणे गायले आहे, ते कृपया करून काढू नकोस. तुझी वाटत असेल तर दुस-या कुणाकडून तरी हे गाणे गाऊन घे. परंतु कृपया माझ्या गाण्याचे एक व्हर्जन ठेव.'
- 'मी अनेक गाणी गायली आहेत. परंतु माझ्या लायब्रेरीमध्ये एक गाणे असे असावे जे मी तुझ्यासाठी गायले आहे. प्लीज, माझी ही ईच्छा पूर्ण होवू दे.'
- 'मला माहित नाही, मी असे का करतोय. याचे परिणाम मी ओळखून आहे. मला वाटत, की तू यामुळे त्रस्त होणार नाहीस. मला ठाऊक आहे, की मी इतकी विनंती करूनसुध्दा तू ठरवलेले आहे, तुझ्या सिनेमात माझे एकही गाणे नसावे. परंतु मी नेहमीच तुझा चाहता राहिल. जग घुमया थारे जैसा ना कोई...'
- नंतर अरिजीतने ही पोस्ट काढून टाकली होती.
सलमानचा मित्र म्हणाला, 'सलमान इतका लहान नाही'...
- सलमानचा जवळचा मित्र निखिल त्रिवेदीने या संपूर्ण वादावर टि्वट केले होते.
- त्याने खुलासा केला होता, सलमानने अरिजीतचे गाणे सिनेमातून काढले नाहीये.
- टि्वट केले होते, 'सलमान इतका लहान नाहीये. त्याने अरिजीतच्या गाण्यावर शूटिंग केले आहे तर तो हे गाणे का काढेल.'
- संगीत दिग्दर्शक अनेक आर्टिस्टकडून एक गाणे गाऊन घेतात. सर्वांत चांगले गाणा-याला अल्बममध्ये ठेवतात.
- 'सुल्तान'च्या गाण्याबाबत पूर्णत: निर्माता आदित्य चोप्रा आणि विशाल शेखर यांचा निर्णय आहे.
- सलमानने अरिजीतला भेटण्यास नकार दिला आहे, कारण हा त्याचा निर्णय आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यानचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...