आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाचे आदेश देणाऱ्यांना सीमेवर पाठवा, हात-पाय थरथर कपायला लागतील : सलमान खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा ट्युबलाइट चित्रपट 23 जूनला रिलीज होतोय. - Divya Marathi
सलमान खानचा ट्युबलाइट चित्रपट 23 जूनला रिलीज होतोय.
मुंबई - सलमान खानने बुधवारी त्याच्या ट्युबलाइट या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत युद्धाबाबत मत मांडले. जे लोक युद्धाचा आदेश सुनावतात त्यांनाच युद्धभूमीवर पाठवायला हवे, युद्ध एका दिवसात संपेल असे तो म्हणाला. जेव्हा ते लोक सीमेवर जातील आणि हातात बंदूक घेतील त्यावेळी त्यांचे हात-पाय थर-थर कापायला लागतील, त्यानंतर थेट टेबलवर चर्चा होईल, असेही सल्लू म्हणाला. सलमानच्या ट्युबलाइट चित्रपटात भारत-चीनमध्ये झालेल्या 1962 च्या युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 23 जूनला रिलीज होतोय. 

युद्धात दोन्ही बाजुचे लोक मारले जातात.. 
- सलमान म्हणाला, ट्यूबलाइटमध्ये आम्ही या (इंडिया-चीन युद्ध 1962) पार्श्वभूमीचा वापर केला आहे. आम्ही त्याच्या खोलात शिरलेलो नाही. आम्ही केवळ या मुद्द्याला स्पर्श केला की, लवकरात लवकर युद्ध संपावे आणि आमचे जवान परत यावेत. 
- युद्ध झाले की, दोन्ही बाजुचे लोक त्यात मारले जातात. मागे केवळ कुटुंब उरते. मुलांना आपल्या वडिलांशिवाय पूर्ण आयुष्य घालवावे लागते. 

युद्धाला कोणाचाही पाठिंबा नसतो - सोहेल 
- ट्युबलाइट चित्रपट कबीर खानने डायरेक्ट केला आहे. मेक्सिकन-अमेरिकन वार ड्रामा 'लिटिल ब्वॉय'वरुन त्याची प्रेरणा घेण्यात आली आहे. 
- सलमानचा भाऊ सोहेलने या चित्रपटात एका हरवलेल्या जवानाची भूमिका केली आहे. 
- सोहेल म्हणाला, तुम्ही कोणालाही विचारून पाहा, कोणीही असे म्हणणार नाही की, युद्ध चांगले असते. सगळे त्याला वाईटच म्हणतील. पण वाद टेबलवर सोडवायला हवेत. कोणीही युद्धाचे समर्थन करत नाही, तरीही युद्धे होतातच. 
 
पुढे वाचा, बजरंगी भाईजानमध्येही दिला संदेश..
बातम्या आणखी आहेत...