आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan, Shah Rukh Khan News In Divya Marathi.

सलमान, शाहरुखविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश, सेटवरील मंदिरात बूट घालून वावरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांनी सेटवरील काली मंदिरात बूट घातल्या प्रकरणाची सुनावणी २४ रोजी होणार आहे.

वकील गौरव गुलाटी यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने सलमान, शाहरुख, कलर्स वाहिनीसह दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या बिग बॉस शोमध्ये शाहरुख ‘दिलवाले ’ या चित्रपटाच्या प्रचार अभियानासाठी गेले होते. यात सलमान आणि शाहरुख काली मातेच्या मंदिरात बूट घालून वावरताना दिसतात. हा हिंदूंचा व त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान आहे. त्यांनी हिंदूंच्या भावना भडकावण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप गुलाटींचा आरोप आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....