आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने काढले Painting, 'बजरंगी भाईजान'च्या कॅप्शनसह केले शेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सलमान खानने काढलेले पेंटिंग)
मुंबईः सुपरस्टार सलमान खानची पेंटिंगची आवड कुणापासूनही लपून राहिलेली नाही. मात्र त्याचे हे आर्टवर्क फार कमी जणांना बघायला मिळत असतं. अलीकडेच सलमानने महिला आणि पुरुषाचे प्रेमात आकंठ बुडल्याचे एक सुंदर पेटिंग रेखाटले आहे. हे पेटिंग त्याचे स्वतःचे आणि 'बजरंगी भाईजान' सिनेमातील त्याची अभिनेत्री करीना कपूरचे असल्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे सलमानने 'बजरंगी भाईजान'च्या कॅप्शनसह हे पेटिंग आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केले आहे.

सलमानच्या या ब्लॅक अँड व्हाइट पेटिंगमध्ये प्रेमी युगल दिसत आहे. महिलेच्या माथ्यावर केवळ एक लाल टिकली झळकते आहे. सलमानने आपल्या या पेटिंगमध्ये विवाहित जोडपं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या पेंटिंगसह सलमानने 'बजरंगी भाईजान'चे हिंदी पोस्टरसुद्धा शेअर केले आहे.
सलमान खान सध्या आपल्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे प्रमोशन वेगवेगळ्या माध्यमांतून करत आहे. पेटिंगसुद्धा प्रमोशनचाच एक भाग म्हणावा लागेल. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमानसह करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यावर्षी 17 जुलै रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढे पाहा, सलमानने केलेले ट्विट...