(गळाभेट घेऊन आमिरने दिला सलमानला धीर, आमिर सोडण्यासाठी घराबाहेर आला सलमान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता
आमिर खान मित्र
सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. गुरुवारी (6 मे) सकाळी गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आमिरने खान कुटुंबीयांसोबत जवळपास दीड तास घालवला. यादरम्यान त्याने सलमान आणि त्याच्या वकिलांसोबत चर्चा केली, की या प्रकरणात पुढे काय करायला हवे. सांगितले जाते, की सलमानने कोर्टातील अनुभवसुध्दा आमिरसोबत शेअर केला.
कथितरित्या त्याने आमिरला सांगितले, कशाप्रकारे न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर कोर्टात चौथ्या मजल्यावर एका छोट्या खोलीत त्याला शिफ्ट करण्यात आले होते. हे तात्पुरत्या तुरुंगाप्रमाणे वाटत होते. सलमानने आमिरला सांगितले होते, की दोन तास त्याच्यासाठी एखाद्या नरकाप्रमाणे होते. त्याला हायकोर्टातून जामील मिळावा यासाठी तो प्रार्थना करत होता. जेव्हा आमिर घरी जाण्यास निघाला तेव्हा सलमान त्याला गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर सोडण्यासाठ आला होता. दोघांनी गळाभेटदेखील घेतली.
आमिर सलमानची आई सलमा यांच्या खूप क्लोज आहे. सलमा यांचे सांत्वन करत आमिर म्हणाला, 'तुमच्याकडे आणखी एक मुलगा आहे.' आमिरने येथे स्वत:ला सलमा यांचा दुसरा मुलगा संबोधले.
बुधवारी (6 मे) मुंबईच्या सत्र न्यायालयात सलमानला 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र हायकोर्टाने त्याला दिन दिवसांचा जामीन मंजूर करून तात्पुरती सुटका केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (8 मे) होणार आहे. पुढील सुनावणीत सलमानच्या जामानीचा कालावधी वाढून मिळतो की त्याला कारावास होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गुरुवारी सकाळी गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर आमिर आणि सलमानचे फोटो...