आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान-सोनाक्षीचा Dubsmash Video, 16 तासांत 10 लाखांहून अधिकांनी पाहिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा सलमान-सोनाक्षीचा डबस्मॅश व्हिडिओ)
मुंबईः सुपरस्टार सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा एक Dubsmash व्हिडिओ आहे. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे, या व्हिडिओत सलमान सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची नकल करताना तर सोनाक्षी गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा यांना कॉपी करताना दिसत आहे.
हा सीन 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरे अपने' या सिनेमातील आहे. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा माला सिन्हाला विचारतात, 'श्याम कहां है?' याचे उत्तर देताना माला सिन्हा म्हणतात, 'वो तो बिट्टू को लेकर दवाखाने गया है'. या संवादात सलमान आणि सोनाक्षीचे लिप्सिंग बघण्यासारखे आहे.
सलमानने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरसुद्धा शेअर केला असून 16 तासांत तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.
काय आहे डबस्मॅशः हे एक मोबाईल अॅप आहे. यामध्ये गाजलेल्या सिनेमातील लोकप्रिय संवादाची ऑडिओ क्लिप असते. या संवादासोबत लिपसिंक करुन युजर त्या संवादासोबत आपला व्हिडिओ बनवू शकतो.