आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Shares First Poster Of \'Prem Ratan Dhan Payo\'

सलमानच्या \'प्रेम रतन धन पायो\'चा First Look, सलमान झाला राजकुमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा First Look - Divya Marathi
सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा First Look
सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सलमान पाठमोरा उभा असून त्याने नीळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढ-या रंगाची धोती परिधान केली आहे. शिवाय गळ्यात सोनेरी रंगाचा दुपट्टाही दिसतोय.
सलमानने आपल्या सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हे पोस्टर रिलीज करुन लिहिले, '‘Good afternoon. Welcoming Sooraj Barjatya's Prem again’
दिग्दर्शक सूरज बडजात्यांच्या या सिनेमाचा ट्रेलर 1 ऑक्टोबरला रिलीज होणारेय. या सिनेमात सलमानसह सोनम कपूर, स्वरा भास्कर, नील नितीन मुकेश, अनुपम खेर आणि अरमान कोहली महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या 12 नोव्हेंबरला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होईल.
पुढे पाहा, सलमानचे ट्विट आणि सिनेमाचे आणखी एक पोस्टर...