आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हीरो' पाहिल्यानंतर चाहत्याने पाठवले तिकिट, सलमान खानने दिला ऑटोग्राफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान, सोबत एका चाहत्याने पाठवलेले तिकिट आणि सलमानचे टि्वट)
मुंबई- बॉलिवू़ड अभिनेता सलमान खानने चाहत्याने पाठवलेल्या 'हीरो'च्या तिकिटावर ऑटोग्राफ दिला आहे. त्याने हे तिकिट मायक्रोब्लॉगिंग साइट टि्वटरवर शेअर केले आहे. त्यासोबत सलमानने लिहिले, 'Signed some tickets of @HeroTheFilm that you had sent . Keep sending . Will sign more tomorrow . tag #HeroKaTicket".'
'बजरंगी भाईजान'नंतर 'हीरो' सलमान खानच्या प्रॉडक्शनचा दुसरा सिनेमा आहे. सिनेमाच्या रिलीजच्या एका दिवसापूर्वी सलमानने चाहत्यासाठी एक खास ऑफर दिली होती. त्याने टि्वटरवरील चाहत्यांना सांगितले, की सिनेमा पाहा आणि त्याचे तिकिट त्याला पोस्ट करा. सलमानच्या सांगण्यानुसार, तो 100 तिकिटांवर साइन करेल. त्यामधील एक तुमचे असू शकते.
सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांचे आभार-
सलमानने 'हीरो' सिनेमा पाहणा-या चाहत्यांचे आभार मानले आहे. त्याने टि्वटरवर लिहिले, 'Thank u for all the compliments on suraj baba and athiya for songs, dances n action of hero. Appreciate it.' ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला आणि जे पाहायला जाणार आहेत त्यांना सलमानने धन्यावाद म्हटले आहे.
निखिल आडवाणी दिग्दर्शित या सिनेमातून आदित्य पांचोलीचा मुलगी सूरज पांचोली आणि सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी बॉलिवूडमध्ये पाऊट टाकत आहेत. सिनेमा शुक्रवारी (11 सप्टेंबर) रिलीज झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानचे टि्वट्स आणि त्याने ऑटोग्राफ केलेले तिकिट्स...