आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिसेप्शनपूर्वी सलमानची बहीण अर्पिताने आयुषसोबत केली नवीन घराची पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवीन घराची पूजा करताना अर्पिता आणि आयुष)
शिमलाः सलमान खानची बहीण अर्पिता आणि आयुष यांच्या लग्नाचे रिसेप्शन सोमवारी
मंडीमध्ये झाले. रिसेप्शनपूर्वी अर्पिता आणि आयुषने मंडीत तयार झालेल्या त्यांच्या नवीन घराची पूजा केली. या पूजेत सलमान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. त्यानंतर खान आणि शर्मा कुटुंब मंदिरातसुद्धा गेले होते. आयुष आणि अर्पिताने मंडीत आपले नवीन घर बनवले असून सध्या त्याचे बांधकाम सुरु आहे.
नोव्हेंबरमध्ये झाले होते लग्न...
माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचा नातू असलेल्या आयुषचे लग्न 18 नोव्हेंबर 2014 रोजी सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिच्यासोबत हैदराबादमध्ये झाले होते. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर आयुषच्या वडिलोपार्जित शहरात दोघांचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले. आयुष आणि अर्पिता 2013 पासून एकमेकांना डेट करत होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पूजा करताना छायाचित्रे...