आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Starrer PRDP Collects 129 Cr, Beats Shah Rukh 'Happy New Year'

4 दिवसांत 'प्रेम रतन..'ने कमावले 129Cr, 250 Cr झाले वर्ल्डवाइड कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर, सलमान खान - Divya Marathi
सोनम कपूर, सलमान खान
मुंबईः सलमान खान स्टारर 'प्रेम रतन धन पायो'ने रिलीजच्या 4 दिवसांत 129.77 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाचे ओवरसीज कलेक्शन 250 कोटींहून अधिक झाले आहे. याची माहिती राजश्री प्रॉडक्शनच्या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. या पोस्टनुसार, सिनेमाने गुरुवारी 40.35 कोटी, शुक्रवारी 31.05 कोटी, शनिवारी 30.07 कोटी आणि रविवारी 28.30 कोटींचा व्यवसाय केला.
मोडला शाहरुखच्या सिनेमांचा रेकॉर्ड
129.77 कोटींचा व्यवसाय करुन PRDP हा ओपनिंग विकेण्डला सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. हा रेकॉर्ड आत्तापर्यंत शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाच्या नावी होता. 'हॅपी न्यू इयर'ने ओपनिंग विकेण्डला 108.86 कोटींची कमाई केली होती.
राजश्री प्रॉडक्शन बॅनरचा आणि सूरज बडजात्या दिग्दर्शित हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. या सिनेमात सलमान खान आणि सोनम कपूर मेन लीडमध्ये आहेत. तर स्वरा भास्कर, नील नितीन मुकेश, अनुपम खेर, दीपक डोबरियान, अरमान कोहली यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, राजश्री प्रॉडक्शनने शेअर केलेला फोटो...