आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुल्तान'ने 'बजरंगी'ला पछाडले, 5 दिवसांत 10 रेकॉर्ड, वर्ल्डवाइड कमाई 344 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'सुल्तान' बॉक्स ऑफिसवर रिकॉर्डतोड कमाई करत आहे. बुधवारी (6 जुलै) रिलीज झालेल्या या सिनेमाने रविवारपर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर नेट 180 कोटींची कमाई केली आहे. तसेच सिनेमाचे ग्रॉस कलेक्शन 252.5 कोटी रुपये झाले आहे. ओव्हरसीज सिनेमाने पाच दिवसांत 92 कोटींचे कलेक्शन केले आहे. अर्थातच सिनेमाने पाच दिवसांत ओव्हरऑल (डोमेस्टिक आणि ओव्हरसीज) 344.5 कोटींचीचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. बुधवारपासून रविवारपर्यंत सिनेमाने प्रत्येक दिवशी 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
सिनेमाने रिलीजपासून आतापर्यंत 10 रेकॉर्ड मोडित काढले...
1# अॅडवान्स बुकिंगचा रेकॉर्ड...
सलमान-अनुष्का स्टारर 'सुल्तान' सिनेमाने रिलीजपासून आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत. प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सनुसार, या सिनेमाने सर्वात जास्त अॅडवान्स बुकिंग रेकॉर्ड केले आहेत. मात्र यशराजने याचे आकडे सांगितले नाहीत.
2# ओपनिंग डेचा रेकॉर्ड
प्री-ईदवर सर्वात जास्त ओपनिंग डे कलेक्शनचा रेकॉर्ड सुल्तानच्या नावी झाला आहे. हे कलेक्शन 36.5 कोटी रुपयांचे होते. कोणताच सिनेमा प्री-ईदवर या आकड्यांपर्यंत पोहोचला नाहीये.
3# पहिल्या तीन दिवसांत सर्वात जास्त कमाई...
सुरुवातीच्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा एखाद्या पहिला हिंदी सिनेमा आहे. सुल्तानने 3 दिवसांत 105 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने 'बजरंगी भाईजान'चा 103
कोटींचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
4# पाच दिवसांत कमाईची सर्वाधिक गती...
सुरुवातीच्या पाच दिवसांत सर्वाधिक जास्त कमाईचा (180 कमाई) रेकॉर्ड केला आहे. बजरंगी भाईजानने 5 दिवसांत 151 कोटींची कमाई केली होती.
5# सतत 30+ कोटींची कमाई...
- सुल्तानने सतत पाच दिवसांपर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा सिनेमाचा स्वत:चा वेगळा रेकॉर्ड आहे.
- या सिनेमाने बुधवारी 36.5 कोटी, गुरुवारी 37.3 कोटी, शुक्रवारी 31.6 कोटी, शनिवारी 36.6 कोटी आणि रविवारी 38.2 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सिनेमा रचलेले विक्रम...
बातम्या आणखी आहेत...