आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'dayवेळी शाहरुखला सलमानने शिकवल्या 'सुल्तान'साठी Moves

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. सुपरस्टार शाहरुख खान 50 वर्षांचा झाला आहे. सोमवारी (2 नोव्हेंबर) रात्री त्याने हा खास दिवस सेलिब्रेट करण्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती, त्यामध्ये बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते. मात्र सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या सलमान खानवर.
सलमानने पार्टीदरम्यान शाहरुखला 'सुल्तान' या आगामी सिनेमाचे काही स्टंट शिकवले. असे आम्ही नव्हे स्वत: शाहरुख खानने टि्वटरवर सांगितले. त्याने सलमान खानसोबतचा एका फोटो शेअर करून त्याखाली लिहिले, 'Bhai teaching me the moves for Sultan on my birthday.' इतकेच नव्हे तर शाहरुखने आणखी एक फोटो शेअर करून सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' या आगामी सिनेमाचे प्रमोशनसुध्दा केले.
सलमान आणि शाहरुख यांची मैत्री नेहमी मीडियाचा चर्चेचा विषय राहिला आहे. कधीकधी त्यांच्यात मतभेद निर्माण होतात तर कधी त्यांच्या गळाभेटीचे फोटो समोर येतात. मात्र, दोघे नेहमी सांगतात, की ते आपसात चांगले मित्र आहे. बर्थडेच्या एका दिवसापूर्वी सलमानने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'प्रेम रतन धन पायो'च्या ग्रुप इंटरव्ह्यूदरम्यान त्याने शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांना सुखात ठेवण्याची प्रार्थना केली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा शाहरुखने शेअर केलेला आणखी एक फोटो...
बातम्या आणखी आहेत...