आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधील दबं‍गगिरीनंतर आता स्‍मार्टफोन बनवणार सलमान, लवकरच लाँच करणार \'बिइंग स्‍मार्ट\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडमध्‍ये दबंगगिरी करणारा भाईजान आता स्‍मार्टफोनच्‍या  मार्केटमध्‍येही पाऊल ठेवणार आहे. होय, सलमान खान लवकरच स्‍वत:ची स्‍मार्टफोन कंपनी लाँच करणार आहे. यासाठी 'बिइंग स्‍मार्ट' या ट्रेडमार्कचीही त्‍याने नोंदणी केली आहे. मध्‍यम ते उच्‍च श्रेणीतील स्‍मार्टफोन बनवण्‍यावर कंपनी आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.
 
माध्‍यमांमधील चर्चेच्‍या अनुसार खूप पूर्वीपासून सलमान या उद्योगात शिरण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. यासाठी अनेक गुंतवणुकदारांशी त्‍याने संपर्क केला होता. सलमान स्‍वत: किंवा आपल्‍या परिवाराद्वारे कंपनीवर नियंत्रण ठेवणार आहे. स्‍मार्टफोनच्‍या निर्मितीसाठी सलमानने मॉडेलही पसंत केल्‍याचे वृत्‍त आहे. हा स्‍मार्टफोन अँड्राइड ऑपरेटिंग सिस्‍टीम वर आधारीत असणार आहे. याची सुरवातीची किंमत 20,000 रुपये असण्‍याची शक्‍यता आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...