आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 तासांसाठी 2.5 कोटी मानधन घेऊन शाहरुखला रिप्लेस करणार सलमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 2016चे फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शन होस्ट करण्यासाठी सलमान खानने कथितरित्या होकार दिला आहे. सांगितले जाते, की सलमानची परवानगी घेणे सोपे नव्हते. त्याला वारंवार विचारल्यानंतर 2.5 कोटींचे मानधन घेऊन होकार दिला. हे एका तासासाठी 1 कोटीपेक्षा जास्त आहे.
शाहरुखचे स्थान घेतले...
आतापर्यंत या सोहळ्याची अभिनेता शाहरुख खानशी जास्त जवळीक राहिली आहे. परंतु विशेष म्हणजे, सलमान कथितरित्या दोन तास सेवा देण्याच्या बदल्यात 2.5 कोटी रुपये मानधन घेणार आहे. यासंबंधित एका सूत्राच्या सांगण्यानुसार, 'अवॉर्ड सोहळ्याला होस्ट करणे आणि पाहणे कंटाळवाणे काम झाले आहे. त्यासाठी समकालीन अवॉर्ड ब्रँड कपिल शर्मा आणि मनीष पॉलसारख्या कलाकारांना घेऊन काम सुरु आहे. या अवॉर्ड शोने सलमानला घेऊन मोठा दाव लावला आहे. टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसचा होस्ट म्हणून तो खूप लोकप्रिय ठरला आहे.'