मुंबई -
सलमान खानच्या बहुचर्चिचत हिट अँड रन प्रकरणातील सेशन कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय आज येणार आहे. या प्रकरणात तीन ते दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने काय निकाल लागतो? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलले आहे. दरम्यान, सलमानचा भाऊ अरबाज खान, सोहेल खान, वडील सलीम खान, बहिण अर्पिता आणि आमदार बाबा सिद्दीकी हे सध्या सलमानच्या बरोबर कोर्टात दाखल झाले आहेत.
हायप्रोफाईल प्रकरण असल्याने या प्रकरणाविषयी जगभरात उत्सुकता आहे. कोर्टाबाहेर सध्या मोठ्या प्रमाणावर मीडिया आणि चाहत्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. माध्यमांसाठी कोर्टाबाहेर ठरावीक अंतरावर व्यवस्था करण्यात आली आहे.
सलमानशी निगडीत हा एकमेव वाद नव्हे, यापूर्वीही तो अनेक वादांच्या भोव-यात अडकलेला आहे. सलमान आणि वाद हे तसे पाहता जुने समीकरण आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सलमान आता जेवढा बदलला आहे, तेवढाच पूर्वी तो रागीट आणि वादग्रस्त होता. ऐश्वर्याबरोबरचे अफेअर असो, अंडरवर्ल्ड डॉनबरोबरचे संबंध असो, शूटिंगच्या ठिकाणी उशीरा पोहोचणे असो, किंवा मनमौजी पद्धतीने काम करणे असो, या सर्व सलमानच्या वाईट बाजू होत्या. प्रत्येकाला सलमानचा भूतकाळ ठाऊक आहे. शिवाय इंडस्ट्रीत इतर अभिनेत्यांबरोबर भांडण करणं हे सलमानसाठी नवीन नाही.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान खानच्या आत्तापर्यंतच्या सर्व मोठ्या वादांबद्दल सांगत आहोत. यामध्ये त्याच्या रिलेशनशिपपासून ते करिअर आणि खासगी आयुष्यापासूनते काळवीट शिकारपर्यंतच्या प्रत्येक कॉन्ट्रोव्हर्सीचा समावेश आहे.