आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या \'ट्यूबलाइट\'चा टीजर रिलीज, ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार फिल्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खान स्टारर अपकमिंग फिल्म 'ट्यूबलाइट'चा टीजर रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये सलमान खानचे वेगवेगळे अंदाज बघायला मिळत आहे. कधी मुलांसोबत मस्ती करताना तर कधी घाबरलेला सलमान यामध्ये दिसतोय. सलमानच्या चेह-यावरील विविध भाव आणि अनेक सीन्स हे 'बजरंगी भाईजान'ची आठवण करुन देणारे आहेत. टीजरमध्ये सलमानचा बॅकग्राउंडमध्ये एक डायलॉग ऐकू येतो. तो म्हणजे 'यकीन एक ट्यूबलाइट की तरह है, जो देर से जलता है। लेकिन जब जलता है तो फुल लाइट कर देता है' 

काय आहे सिनेमाची कथा...
- 'ट्यूबलाइट' या सिनेमाची कहाणी 1962 साली झालेल्या भारत- चीन युद्धाच्या अवतीभोवती फिरते. ही दोन भावांची कथा आहे. यामध्ये एक भाऊ युद्धातून बेपत्ता होतो. तर दुसरा त्याच्या शोधात निघतो.  
- 'एक था टाइगर' आणि 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान  यांच्यासोबतचा सलमानचा हा तिसरा सिनेमा आहे.
- हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारेय. 
- सलमानसोबत या सिनेमात सोहेल खान आणि चीनी अॅक्ट्रेस जूजूची महत्त्वाची भूमिका आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, टीजरमधील सलमानचे 6 PHOTOS आणि व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...