आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Was Danced In Sister Arpita Khan's Wedding

PHOTOS: बहीण अर्पिताच्या लग्नात ढोलताशावर असा थिरकला होता सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयुषच्या भावाने शेअर केलेला सलमान खानचा फोटो)
मुंबई- सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. परंतु तिच्या लग्नाचे फोटो अजूनही इंटरनेट आणि इतरम माध्यमांमध्ये समोर येताना दिसतात. अलीकडेच अर्पिताचा पती आयुषचा भाऊ आश्रय शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमधील एका फोटोमध्ये सलमान खान ढोलताशावर थिरकरताना दिसतोय. शिवाय काही फोटोंमध्ये शाहरुख खान अर्पिता आणि आयुषसोबत दिसत आहे. काही फोटोंमध्ये हृतिक रोशन, सिध्दार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूरसारखे अनेक बॉलिवूड सेलेब्स रिसेप्शन एन्जॉय करताना दिसून येत आहेत.
अर्पिताचे लग्न 18 नोव्हेंबर 2014मध्ये दिल्लीचा उद्योगपती आयुष शर्मासोबत झाले. वेडिंग सेरेमनी हैदराबादच्या पंचतारांकित हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये झाले. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये रिसेप्सशन ठेवण्यात आले होते. त्यामध्ये अनेक प्रसिध्द आणि दिग्गज सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आश्रय शर्माने शेअर केलेली आणि तुम्ही न पाहिलेली छायाचित्रे...