आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान शिकणार शुभंकर-मोनाकडून शिल्पकला, \'बजरंगी भाईजान\'चे हँडमेड पोस्टर भावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या पोस्टरवर स्वाक्षरी करताना अभिनेता सलमान खान. समवेत शुभंकर मोना कांबळे.)
नगर- प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आता शिल्पकलेचे धडे गिरवायचे आहेत. शाडूची आणि काष्टशिल्पं कशी तयार करायची, हे मला शिकवा, असं त्यानं नगरचे तरूण चित्रकार शुभम मोना कांबळे यांना सांगितलं.
सलमानच्या बहुचर्चित "बजरंगी भाईजान' या चित्रपटाचं अॅक्रेलिक रंगातील पोस्टर शुभम मोना यांनी हाताने तयार केलं (हँडमेड) आहे. चार गुणिले तीन फूट आकाराचे हे पोस्टर त्यांनी बजरंगी टीम सलमान खानच्या पीएला मेल केले होते. हे पोस्टर सलमानला आवडले. त्याने शुभंकर मोना यांना १२ जुलै रोजी मुंबईतील मेहबूब स्टुडिओत भेटीसाठी बोलावले. सलमानने त्यांच्याशी शिल्प चित्रकला या विषयावर सुमारे दीड तास चर्चा केली. शुभंकरचे वडील प्रमोद कांबळे यांचे ब्रोशरही त्याने पाहिले. त्यातील शुभंकरने तयार केलेले "निर्भया'चे शिल्प त्याला विशेष भावले.
शुभंकरच्या कलेचे त्याने कौतुक केले. आर्ट स्टुडिओमध्ये शिल्प चित्रे कशी तयार होतात, याची माहिती जाणून घेतल्यानंतर सलमानने मला शिल्प चित्रकला शिकायची आहे, असे सांगितले. सलमानने स्वत: अॅक्रेलिक ऑईलपेंटमध्ये तयार केलेली चित्रेही त्यांना यावेळी दाखवली.
बजरंगी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इतर चित्रपटांच्या चित्रीकरणातून निवांत झाल्यानंतर आपल्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण सलमानने कांबळे दाम्पत्याला दिले.
तेथे तो या दोघांकडून शाडूचे शिल्प काष्टशिल्प कसे तयार करायचे हे शिकून घेणार आहे. "बजरंगी'चे लॉकेट देऊन कांबळे दाम्पत्याच्या कलाप्रवासासाठी सलमानने शुभेच्छा दिल्या.
गुजरा हुआ जमाना
- 'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या पोस्टरच्या निमित्ताने हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील हँडमेड पोस्टरचा "गुजरा हुआ जमाना' परत यायला हवा. या पोस्टरमध्ये आम्ही मध्यभागी सलमान खान आणि त्याच्या दोन्ही बाजूला अभिनेता नवाजुद्दीन अभिनेत्री करिना कपूर यांची चित्रे रेखाटली आहेत. अशा प्रकारची पोस्टर्स तयार करण्याचे स्वतंत्र दालन नगरमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. नव्या पिढीतील रसिकांनी अशी पोस्टर नक्की आवडतील.''
शुभम मोना कांबळे, चित्रकार.
बातम्या आणखी आहेत...