आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात शूज लटकवून भाच्यासोबत मस्ती करतोय सलमान, मनालीत असे एन्जॉय करतोय शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खान आपल्या आगामी ट्युबलाइट या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने सध्या मनालीत आहे. सलमानची धाकटी बहीण अर्पिताने सलमानच्या शूटिंग सेटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सलमान गळ्यात शूज लटकवून भाचा आहिलसोबत मस्ती करताना दिसतोय. दोघांसोबत अर्पिताचा नवरा आयुष शर्मासुद्धा दिसतोय. अर्पिताने आयुष, सलमान आणि आहिल आपले आयुष्य म्हटले आहे.
काय लिहिले अर्पिताने...
अर्पिताने फोटो पोस्ट करुन लिहिले, "एका फ्रेममध्ये माझे आयुष्य. माझा भाऊ, माझा नवरा आणि माझा मुलगा. माझी शक्ती, माझा आनंद."

पुढील वर्षी ईदला रिलीज होणार 'ट्युबलाइट'
कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमान त्याच्यापेक्षा वयाने १८ वर्षे लहान चायनीज अॅक्ट्रेस जूजूसोबत रोमान्स करताना दिसणारेय. या सिनेमाची कथा १९६२ च्या इंडो-सिनो वॉरच्या काळातील असल्याचे म्हटले जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'ट्युबलाइट' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात क्लिक झालेली सलमानची आणखी छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...