आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या 'बजरंगी भाईजान'मधील लॉकेटचा होणार लिलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाच्या पोस्टरवर सलमान खान)
मुंबईः आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमात बॉलिवूड स्टार सलमान खानच्या गळ्यातील लॉकेटचा लिलाव होणार असल्याचे वृत्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान या लॉकेटचा लिलाव केला जाणार आहे. लॉकेटची सुरुवातीची किंमत 71,154 एवढी लावण्यात आली आहे. बजरंगी भाईजानचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, सलमानच्या गळ्यात असलेल्या गदेच्या आकारातील लॉकेट चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. याच कारणामुळे निर्मात्यांनी त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतकेच नाही तर यासोबत सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच चाहत्यांना सलमानसोबत सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे. सलमान चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याची मोहिम सुरु करणार आहे.
'बजरंगी भाईजान' हा सिनेमा कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये सलमानसोबत करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज होणारेय.