मुंबई - बॉलिवूडच्या बॅड बॉयला न्यायालयाने 2002 च्या 'हिट अँड रन' केसमध्ये दोषी ठरवले असून दुपारी 1.10 मिनिटांनी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सलमान खानवर हिट अँड रन प्रकरणासोबतच जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणाची देखील केस सुरू आहे.
दरम्यान, हिट अँड रन प्रकरणांवर न्यायालयात वेळोवेळी होत असलेल्या सुनावणीच्या योग्य बातम्या मीडियातर्फे दाखवण्यात येत नाहीये. त्यामुळे नाराज झालेल्या
सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची योग्य माहिती सलमानच्या चाहत्यांना मिळावी यासाठी 'salmankhanfiles.com' या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. हे संकेतस्थळ वेळोवेळी अपडेट करण्याची जबाबदारी सलमानचे वकील करत आहेत.