आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sylvester Stallone Thanks Salman Khan For Compliment, Says 'Maybe Let's Do New ‎Expendables‬ Together

EXPENDABLES मध्ये सलमानसोबत काम करण्यास हॉलिवूड स्टार स्टेलॉन इच्छूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः हॉलिवूड स्टार सिल्व्हेस्टर स्टेलॉनने अभिनेता सलमान खानसोबत अॅक्शन सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी म्हटले, की सलमान खानसोबत त्याच्या आणि माझ्या फॅन्ससाठी एक अॅक्शन सिनेमा करु इच्छितो. आम्हा दोघांत नवीन एक्सपेडेंबल्सची शक्यता असल्याचे त्यांनी Sylvester Stallone @TheSlyStallone या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे.
'रॉकी', 'रॅम्बो' यांसारख्या अॅक्शनपटात झळकलेले सिल्व्हेस्टर स्टेलॉन 'एक्सपेंडेबल्स' सीरिजच्या तीन सिनेमांत झळकले आहेत. विशेष म्हणजे सलमानसुद्धा स्टेलॉन यांचा फॅन असून त्याने शुक्रवारी ट्विट केले, की तुम्हाला जर कुणाला फॉलो करायचे असेल तर हीरोचा हीरो सिल्व्हेस्टर स्टेलॉनला फॉलो करा. त्यानंतर स्टेलॉन यांनी सलमानला थँक्स म्हणत हे ट्विट केले.
काय म्हटले होते सलमानने...
बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेस आणि पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणा-या सलमानने शुक्रवारी एका रहस्यावरुन पडदा उचलला. सलमान कुणाला आपला हीरो मानतो, हे त्याने उघड केले. त्याने ट्विट केले, ''जर कुणाला फॉलो करायचे आहे तर @TheSlyStallone ला फॉलो करा. तुमच्या हीरोचा हीरो सिल्व्हेस्टर स्टेलॉन.''
सिल्व्हेस्टर स्टेलॉन हॉलिवूडमधील अॅक्शनपटांसोबतच बॉडी बिल्डींगसाठी ओळखले जातात.
सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांनी सलमानला म्हटले इंडियन सुपरस्टार
सलमानने ट्विटरवर केलेले कौतुक स्टेलॉन यांनी स्वीकारले. त्यांनी एक ट्विट करुन सलमानचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विट मध्ये म्हटले, "मी सुपर टॅलेंटेड इंडियन सुपरस्टारला थँक्स म्हणू इच्छितो. त्याने माझ्यासाठी जे ट्विट केले, त्यासाठी थँक्स. आम्हा दोघांना एक अॅक्शन सिनेमा एकत्र करायला हवा."
पुढे स्टेलॉन म्हणाले, "सलमान मी तुझ्या डीवोटेड फॅन्समुळे प्रभावित झालोय. एखादा अॅक्शन सिनेमा यशस्वी ठरावा यासाठी तुला पाठिंबा देणा-या ग्रेट फॅन्सची गरज असते."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा : सलमान आणि सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांचे ट्विट्स...