सलमान खान आणि सोनम कपूर अभिनीत 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये सुरू आहे. हा चित्रपट 2 तास 50 मिनिटांचा आहे. सुरुवातीचा ट्रेलर, जाहिरात आणि मध्यंतराचा वेळ मिळून हा 3 तास 10 मिनिटांचा झाला आहे. त्यामुळे सिनेमागृहांमध्ये शोच्या वेळा जुळत नव्हत्या. आता दिग्दर्शकाने चित्रपटाच्या संपादनामध्ये गाण्यांचे कडवे घटवले आहेत.
सूत्रांच्या मते, महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये थंडी वाढल्याने सकाळ आणि रात्रीच्या शोऐवजी प्रेक्षक दिवसाच्या शोला जास्त गर्दी करत आहेत. दिग्दर्शकाने केलेल्या 11 मिनिटांच्या संपादनामुळे दिवसभरात एक तासाचा फरक पडला आहे, जेणेकरून रात्रीचा किंवा सकाळच्या कोणत्याही शोचा वेळ एक तासाने वाढवता येईल. लोकांकडून आणि वितरकांकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर हे संपादन शुक्रवारी रात्री स्वत: सूरज बडजात्यांनी केले आहे. कथेच्या दृश्यांऐवजी गाण्यांचे कडवे कमी करण्यात आले आहेत. यामुळे प्रेक्षकांची गैरसोय दूर झाली असल्याचे सूरज बडजात्यांनी सांगितले.