आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Spotted : बेबी बंपसोबत दिसली सलमानची धाकटी बहीण अर्पिता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्पिता खान आणि आयुष शर्मा - Divya Marathi
अर्पिता खान आणि आयुष शर्मा

मुंबईः अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा मामा होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला दिली होती. सलमानची धाकटी बहीण अर्पिता खान लवकरच आई होणारेय. गुरुवारी अर्पिता बेबी बंपसोबत दिसली. हिट अँड रनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सलमानच्या घरी पाहुण्यांची रिघ लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली आहे. ही बातमी समजताच अर्पिता गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचली. घरातून बाहेर पडत असताना ती बेबी बंपसोबत क्लिक झाली. यावेळी तिचा नवरा आयुष शर्मासोबत होता.
सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा अर्पिताच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आली होती. सलमानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत ही गोड बातमी दिली होती. ते म्हणाले होते, की होय, आमच्या घरी पुन्हा एकदा सेलिब्रेशन आहे. अर्पिता प्रेग्नेंट असल्याने आम्ही सर्वज खूप आनंदी आहोत.
अर्पिता गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील बिझनेसमन आयुष शर्मासोबत विवाहबद्ध झाली होती. हैदराबाद येथील प्रसिद्ध हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये शाही थाटात तिचे लग्न झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पडतानाची अर्पिता आणि आयुषची
छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...