आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची बहीण अर्पिताच्या डोहाळे जेवणात पोहोचले फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या एका प्रेग्नेंट मैत्रिणीसोबत पोज देताना अर्पिता - Divya Marathi
आपल्या एका प्रेग्नेंट मैत्रिणीसोबत पोज देताना अर्पिता

मुंबईः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा प्रेग्नेंट आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईत तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. यावेळी तिच्या कुटुंबीयांसह जवळच्या मैत्रिणी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची छायाचित्रे अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. 2014 मध्ये आयुष शर्मासोबत अर्पिता लग्नगाठीत अडकली होती. या दाम्पत्याचे हे पहिले बाळ आहे.
सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे अर्पिता
25 वर्षीय अर्पिता डिझाइन आणि आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत आहे. ती सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे. पाच मुलांमध्ये ती सर्वात लहान आहे. अर्पिताला सलमान, अरबाज आणि सोहेल हे तीन भाऊ आहेत. तिघेही अभिनेते आणि निर्माते आहेत. तर तिची बहीण अलविरा अभिनेता-दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीची पत्नी आहे.
पुढे पाहा, अर्पिताच्या डोहाळे जेवणाची खास छायाचित्रे...