आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पुढील वर्षी ईदला रिलीज होणार सलमानचा 'सुल्तान', टीजर झाला रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' हा आगामी सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सिनेमात सलमान 40 वर्षांच्या बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. मंगळवारी यशराज फिल्म्सने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर या सिनेमाचा 34 सेकंदांचा टीजर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते, "Drop EVERYTHING: @BeingSalmanKhan In & As SULTAN #SultanEid2016"
यशराज बॅनरच्या सुल्तान या सिनेमात सलमान खान मेन लीडमध्ये आहे. अली अब्बास जफर या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वी 'मेरे ब्रदर की दुल्हन' हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. लीड अॅक्ट्रेसच्या रुपात परिणीती चोप्रा, कंगना रनोट आणि दीपिका पदुकोण यांच्यापैकी एका अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सध्या सलमान दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याशिवाय सूरज बडजात्यांच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचेही तो शूटिंग करतोय.