आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khurshid Plays Saif Ali Khan In This Kal Ho Na Ho Remake

VIDEO: सलमान खुर्शीद बनले अभिनेता, जर्मन राजदुतांच्या पत्नीसोबत केला डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'कल हो ना हो'च्या रिमेकचा आठ मिनिटांचा व्हिडिओ)

नवी दिल्ली- काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांना आता अभिनयाचे वेध लागले आहेत. जर्मनीच्या भारतातील राजदुतांनी शाहरुख खान स्टारर आणि सुपरहिट ठरलेल्या ‘कल हो ना हो’ या सिनेमाच्या आठ मिनिटांचा रिमेक व्हिडिओ बनवला आहे.
या व्हिडिओत सलमान खुर्शीद हे सैफ अली खानच्या भूमिकेत पाहायला मिळाले. या सिनेमातील टायटल ट्रॅकवर सलमान खुर्शीद यांनी डान्सही केला आहे. त्यांच्या या नवीन रुपाची सोशल मीडियावर बरीच चर्चा असून ते सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ यू ट्यूबवर धुमाकूळ घालत या व्हिडिओला हिट्सवर हिट्स मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान खुर्शीद यांनी अभिनय केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
आठ मिनिटांच्या या रिमेक व्हिडिओत सलमान खुर्शीद सैफ अली खानच्या भूमिकेत आहेत, मग या गाण्यातील शाहरुख खान आणि प्रीती झिंटा कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या व्हिडिओमध्ये शाहरुखच्या भूमिकेत स्वत: भारतातील राजदूत मायकल स्टॅनर आहेत, तर त्यांची पत्नी एलिस यांनी प्रीती झिंटाचा रोल निभावला आहे.

हिंदी सिनेमांचे चाहते आहेत मायकल स्टॅनर..
स्टॅनर यांनी बॉलिवूडच्या 150 पेक्षा अधिक सिनेमे पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी शाहरुखच्या प्रत्येक स्टेप कॉपी केल्या आहेत.
सैफच्या भूमिकेत सलमान खुर्शीद...
2003 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात सैफ अली खानने साकारलेली भूमिका सलमान खुर्शीद यांनी रिमेकमध्ये वठवली आहे. यामध्ये हॉस्पिटलचा तो सीनही घेण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहरुखच्या आईचा रोल आहे, ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर दिसतात
सैफ म्हणाला, ''सलमान भाई, तुम्ही आम्हाला बेरोजगार कराल...''
दिल्लीत शुक्रवारी हा व्हिडिओ लाँच करण्यात आला. यावेळी अभिनेता सैफ अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोरही उपस्थित होते. व्हिडिओ बघून सैफ अली खान आनंदी दिसला. त्याने सलमान खुर्शीद यांच्या अभिनयाचे कौतुक करताना म्हटले, ''सलमान भाई तुम्ही खूप चांगला अभिनय केला आहे. तुम्ही तर आम्हाला बेरोजगार करु शकता. (हसून)''
पुढे वाचा, जावेद अख्तर म्हणाले, राजकाराणी असतात उत्तम कलाकार...