आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायिकेने सलमानवर साधला निशाणा, \'हा नॅशनल हीरो आहे?\', चाहत्यांच्या अश्लिल कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायिका सोना महापात्राने टि्वट करून 'रेप्ड वुमन'च्या वक्तव्याने सलमानवर निशाणा साधला होता. - Divya Marathi
गायिका सोना महापात्राने टि्वट करून 'रेप्ड वुमन'च्या वक्तव्याने सलमानवर निशाणा साधला होता.
मुंबई: सलमान खानच्या 'रेप्ड वुमन'च्या वक्तव्यावर वाद वाढत चालला आहे. एससीपीने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे गायिका सोना महापात्रावर लोकांनी निशाणा साधून अश्लिल कमेंट्स केल्या आहेत. सलमानने त्याच्या आगामी सिनेमाविषयी सांगितले होते, की जेव्हा तो शूटिंग करून बाहेर यायचा तेव्हा त्याला बलात्कार पीडित महिलेसारखे वाटत होते. तो सरळ चालू शकत नव्हता.
टि्वटमध्ये काय म्हणाली होती सोना?
- सोना महापात्राने मंगळवारी (21 जून) टि्वटमध्ये म्हटले होते, 'महिलांना मारले, लोकांवर गाडी घातली, प्राण्यांची शिकार केली आणि तरीदेखील तो देशाचा हीरो. हे चुकी आहे. भारत अशा चाहत्यांनी भरलेला आहे.'
- सोनाच्या या टि्वटनंतर सलमानच्या चाहत्यांनी त्याला टॅग करून टि्वटर आणि फेसबुकवर अश्लिल कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
- सोनाने काही कमेंट्सचे स्क्रिनशॉट्स करून पोस्ट करून लिहिले, 'असे टि्वट करणारे 'भाई'चे चाहते आहेत. हे दिसते, की त्यांच्या हीरोने त्यांच्यासमोर कसे उदाहरण सादर केले.'
- डिअर आयडल ऑफ मिलियन्स, तुमच्या वडिलांव्दारे माफी मागणे पूरेसे नाहीये. बदल घडवण्यासाठी चाहत्यांना शिकव.
- डिअर भाईचे चमचे, तुम्ही मला सिक, चिप आणि ******* लिहून सतत माझ्याच मुद्दाल सिद्ध करत आहात.
- सोनाने या मुद्दाला जोडून 11 टि्वट केले.
मुंबईमध्ये सलमानच्या विरोधात तक्रार...
- नॅशनल काँग्रेस पक्षाच्या महिलांनी मंगळवारी मुंबईच्या सीताबुलाडी पोलिस ठाण्यात लिखित तक्रार दिली आहे.
- यांची मागणी आहे, की सलमानला अटक व्हावी, कारण त्याने महिलांचा अपमान केला.
अरबाजने केली सलमानची वकीली...
- वडिलांनंतर आता सलमानचा थोरला भाऊ अरबाज खानने त्याची बाजू घेतली आहे. अरबाज म्हणाला, 'सलमानचे म्हणणे चुकीचे नव्हते. जर त्याला वाटले, की चुकी झाली आहे तर तो माफी नक्की मागेल.'
- यापूर्वी सलीम खान यांनी आपल्या मुलाच्या टिप्पणीबद्दल त्याच्या वतीने माफी मागितली आहे.
- माझ्या मुलाने उपमा, उदाहरण आणि संदर्भ म्हणून जे काही म्हटले ते नि:संशय चुकीचेच आहे. त्याच्या चुकीबद्दल क्षमा असावी, असे ट्विट त्यांनी केले आहे.
- मात्र, या माफीनंतरही लोकांची नाराजी कमी झालेली नाही.
आतापर्यंत काय झाले?
- नॅशनल कमीशन फॉर वुमनने सलमानला 7 दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे.
- सलमानच्या या तुलनेमुळे दिल्लीत गाजलेल्या अत्याचार प्रकरणातील निर्भयाची आई प्रचंड संतापली. "सलमान माझ्या मुलीस भेटला असता तर त्याला अत्याचारानंतरच्या वेदना काय असतात हे कळाले असते,' अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्या.
- दरम्यान, राजस्थानातील 31 वर्षीय अत्याचार पीडित रश्मी (बदलेले नाव) महिलेने सलमानला उद्देशून म्हटले आहे की, तुमच्या वेदना तर पैशासाठी आहेत. आमच्या वेदनेवर तर उपायच नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, गायिका सोना महापात्राने काय टि्वट केले होते आणि भडकलेल्या चाहत्यांच्या रिअॅक्शन...
बातम्या आणखी आहेत...