आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या मुहूर्तावर सलमानने दिले ख्रिसमस गिफ्ट, पाहा 'टायगर झिंदा है'चा First Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सलमान खान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर त्याच्या फॅन्ससाठी नवीन चित्रपट घेऊन येत असतो. पण यावर्षी ईदला आलेला त्याचा चित्रपट 'ट्यूबलाइट' पार प्रकाश पाडू शकला नाही. पण तरीही सलमान वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर ग्रँड एंट्री करण्याच्या तयारीत आहे. सलमान खान आणि कतरिना स्टारर 'टायगर झिंदा है' हा चित्रपट यावर्षाच्या अखेरीस ख्रिसमसला रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने सलमानने चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. 

सलमानने त्याच्या 'टायगर झिंदा है' चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज केला आहे. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे आजच सलमानने चाहत्यांना हे दिवाळी गिफ्ट दिले आहे. सलमानने त्याच्या या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे पोस्टर सोशल मीडियात पोस्ट करत, त्याबरोबर लिहिले, Diwali Gift.... pasand aaya? Ab Christmas pe milna... #tigerzindahai. 

सलमान आणि कतरिना यांच्याच 'एक था टायगर' चित्रपटाचा हा सिक्वल आहे. 2012 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी 'सुल्तान' फेम डायरेक्टर अली अब्बास जफरकडे आहे. 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, सलमानचे ट्वीट..
बातम्या आणखी आहेत...