आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडीलच नाही, सलमानच्या कुटुंबातील सगळ्यांचेच पार्टनर आहेत वेगळ्या धर्माचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - सलीम खान, सलमान खान, सलमा उर्फ सुशीला चरक आणि हेलन)
जोधपूरः काळवीटाची शिकार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीला बॉलिवूड अभिनेता सलमान आज जोधपूर कोर्टात हजर झाला होता. यावेळी सलमानने सर्व आरोप फेटाळले. पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्याला या प्रकरणात विनाकारण अडकवल्याचा दावा देखील सलमानने कोर्टात केला. सुनावणीत कोर्टाने सलमानला त्याचा धर्म विचारण्यात आला. त्यावर सलामानने उत्तर दिले, 'मी भारतीय आहे'. कोर्ट म्हणाले, 'देशातील प्रत्येक नागरिक भारतीय असतो. तुझी नेमकी जात कोणती' असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सलमान म्हणाला, 'माझी आई हिंदू तर वडील मुसलमान आहे. त्यामुळे माझा धर्म आणि जात 'भारतीय'च असल्याचे मी मानतो.'
उल्लेखनीय बाब महणजे, सलमान खानचे आईवडीलच नव्हे तर बहीण भावांनीसुद्धा वेगवेगळ्या धर्मातील लोकांसोबत लग्न केले आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

सलमानच्या आईचे खरे नाव आहे सुशीला चरक
सलमान खानने कोर्टात सांगितले, त्याची आई हिंदू आणि वडील मुसलमान आहेत. सलमानचे वडील सलीम खान हे प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. 1964 मध्ये त्यांनी सुशील चरक यांच्यासोबत लग्न केले. सुशीला यांचा जन्म मराठी हिंदू कुटुंबात झाला. लग्नाच्या वेळी सुशीला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव सलमा असे ठेवले. त्या सलीम खान यांच्या पहिल्या पत्नी आहेत. अभिनेत्री हेलन यांच्यासोबत सलीम खान यांनी दुसरे लग्न केले. हेलन या ख्रिश्चन आहेत.
सलमानच्या भावांनी केले वेगळ्या धर्मातील तरुणींशी लग्न
सलीम खान आणि सुशीला चरक यांची चार मुले आहेत. सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा. अर्पिता खान ही त्यांची दत्तक घेतलेली बहीण आहे. विशेष म्हणजे, सलीम खान यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलांनीदेखील वेगवेगळ्या धर्मात लग्न केले. अरबाज खान आणि सोहेल खानने हिंदू कुटुंबातील तरुणींशी लग्न थाटले. अरबाजची पत्नी मलायका अरोरा खान पंजाबी कुटुंबातील आहे, तर सोहेल खानची पत्नी सीमा सचदेव हीदेखील हिंदू आहे. सलमानची बहीण अलविरा हिनेदेखील हिंदू धर्माचे अभिनेते-निर्माते अतुल अग्निहोत्रीसोबत लग्न केले आहे. तर अर्पिता खानचे याचवर्षी आयुष शर्मासोबत लग्न झाले.
आपल्या घराला 'मिनी इंडिया' संबोधतो सलमान खान
सलमान खान आपल्या कुटुंबाला मिनी इंडिया म्हणून संबोधतो. कारण त्याच्या कुटुंबात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कुटुंबातील लोक एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमान खानच्या कुटुंबातील कपल्सची छायाचित्रे...