आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार पीडितेशी केली तुलना, सलमान गोत्यात, पित्याची माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खान बलात्कार पीडितेशी संबंधित वक्तव्यामुळे चांगलाच गोत्यात आला.‘ सुल्तान’ चित्रपटातील दृश्यांच्या कठोर आणि थकवून टाकणाऱ्या चित्रीकरणानंतर मला बलात्कार पीडितेसारखेच वाटायचे, असे सलमान खान एका मुलाखतीत म्हणाला होता. त्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.

५० वर्षीय सलमानला कुस्तीवर आधारित सुल्तान चित्रपटासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले. स्पॉटबॉय या ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सलमानने थकवून टाकणाऱ्या दृश्यांनंतर आपली स्थिती वर्णन केली होती.

... त्याचे चुकलेच
पटकथाकार सलीम खान यांनी आपल्या मुलाच्या टिप्पणीबद्दल त्याच्या वतीने माफी मागितली आहे. माझ्या मुलाने उपमा, उदाहरण आणि संदर्भ म्हणून जे काही म्हटले ते नि:संशय चुकीचेच आहे. त्याच्या चुकीबद्दल क्षमा असावी, असे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र, या माफीनंतरही लोकांची नाराजी कमी झालेली नाही.

निर्भयाची आई संतप्त
सलमानच्या या तुलनेमुळे दिल्लीत गाजलेल्या अत्याचार प्रकरणातील निर्भयाची आई प्रचंड संतापली. "सलमान माझ्या मुलीस भेटला असता तर त्याला अत्याचारानंतरच्या वेदना काय असतात हे कळाले असते,' अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, राजस्थानातील एका अत्याचार पीडित महिलेने सलमानला उद्देशून म्हटले आहे की, तुमच्या वेदना तर पैशासाठी आहेत. आमच्या वेदनेवर तर उपायच नाही.
पुढे वाचा, यूझर्सच्या सलमानच्या या वक्तव्यावर काय रिअॅक्शन आल्या...
बातम्या आणखी आहेत...