आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुल्तानच्या रिलीजआधी सलमान म्हणाला- मी कमी बोलले पाहिजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - बलात्कार पीडितेसारखे वाटते, या वक्तव्याने वादात अडकलेल्या सलमानने देशाबाहेर जाऊन या वादावर तोंड उघडले आहे. त्याने माफी मागितलेली नाही तर, वादांपासून दूर राहाण्यासाठी कमी बोलणार असल्याचे म्हटले आहे. सलमान आयफा सोहळ्यासाठी स्पेनहून माद्रिदला पोहोचला आहे. त्याचा आगामी चित्रपट सुल्तान ईदला प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या कोणत्या वक्तव्याने वाद
- सलमान खानने सोमवारी मुंबईत एक मुलाखत दिली.
- तो म्हणाला, 'शूटिंगदरम्यान सहा तास मेहनत घ्यावी लागत होती. ते माझ्यासाठी खूप कठिण होते.'
- 'कारण मला 120 किलोच्या पहिलवानांना 10 वेगवेगळ्या अँगलने उचलायचे होते.'
- 'अनेकदा त्यांची पाठ जमिनीला लावावी लागत होती. रिंगमध्ये असे एकदा नव्हे अनेकदा करावे लागत होते. जेणेकरून ही फाइट खरी वाटेल.'
- 'शॉटनंतर जेव्हा रिंगमधून बाहेर निघत होता, तेव्हा मला रेपची शिकार झालेल्या महिलेसारखे वाटत होते. मी सरळ चालूच शकत नव्हतो.'
- 'शूटिंगनंतरसुद्धा ट्रेनिंग सेशनसाठी जावे लागत होते.'
निर्भयाची आई संतप्त...
सलमानच्या या तुलनेमुळे दिल्लीत गाजलेल्या अत्याचार प्रकरणातील निर्भयाची आई प्रचंड संतापली. "सलमान माझ्या मुलीस भेटला असता तर त्याला अत्याचारानंतरच्या वेदना काय असतात हे कळाले असते,' अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान, राजस्थानातील एका अत्याचार पीडित महिलेने सलमानला उद्देशून म्हटले आहे की, तुमच्या वेदना तर पैशासाठी आहेत. आमच्या वेदनेवर तर उपायच नाही.
बलात्कार पीडितांवर वक्तव्य केल्याने सलमान खान वादाच्या भोव-यात अडकला आहे. या प्रकरणात सलमानचे वडील सलीम खान आणि भाऊ अरबाज खान सतत त्याची बाजू मांडत आहे. सलीम खान यांनी सलमानच्यावतीने माफीदेखील मागितली. मात्र, सलमानला आपल्या चुकीची जराही जाणीव नसल्याचे दिसत आहे. कारण तो हा वाद सुरु असताना नुकताच IIFA सोहळ्यासाठी स्पेनला रवाना झाला आहे. एअरपोर्टवर मीडियाने या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता तिथून गुपचुप निघून गेला.

कंगना रनोटने केली टीका...
अभिनेत्री कंगना रनोटने सलमानच्या वादग्रस्त वक्तव्यावर टिका केली आहे. 'कृती' सिनेमाच्या प्रिमिअरला विशेष पाहूणी म्हणून उपस्थित असलेली कंगना म्हणाली, 'सर्वांना ठाऊक आहे, की ही खूपच असंवेदनशील टिप्पणी आहे. परंतु आपण एकमेकांवर बोट उचलण्याच्या मानसिकतेला प्रोत्साहन द्यायला नको. समाज म्हणून आपण त्याची जबाबदारी घ्यायला हवी आणि एकत्र राहायला हवे. एका विशिष्ट व्यक्तीसाठी नाही हे समाजासाठी अपमानकारक आहे. त्या विचारासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन माफी मागायला हवी.'
बातम्या आणखी आहेत...