आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणाली, \'माझे लैंगिक शोषण झाले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचे ती पाच वर्षांची असताना लैंगिक शोषण झाले होते. याची माहिती स्वतः सोमी अलीने एका मुलाखतीदरम्यान दिली आहे. मुळची पाकिस्तानातील सोमी अली आता अमेरिकेत 'नो मोअर टिअर्स' नावाच्या सामाजिक संस्थेसाठी काम करते. ही संस्था पीडित स्त्रियांसाठी काम करते. नुकताच या संस्थेचा आठवा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी सोमी अलीने संस्था स्थापन करण्याचा उद्देश सांगितला.
कौटुंबिक हिंसेच्या वातावरणात वाढली
सोमीने मुलाखतीत सांगितले, की मी पाकिस्तानमध्ये अशा वातावरणात वाढले जिथे महिलांना अतिशय वाईट पद्धतीने वागवले जात होते. माझ्या आईच्या अनेक मैत्रिणींना घरात मारहाण होत होती. जेव्हा मी माझ्या आईला तिच्या मैत्रिणींच्या शरीरावरील व्रणांबद्दल विचारत होते, तेव्हा मला सांगितले जात होते की ती पायर्‍यांवरुन पडली किंवा स्वंयपाक घरात काम करताना चटका बसला. वास्तव हे होते, की त्यांना घरात मारहाण होत होती, आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे ते त्यांच्या सवयीचे झाले होते.
नोकराने केले शोषण
सोमीने स्वतःवर गुदरलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'घरात एक नोकर होता, त्याने माझे लैंगिक शोषण केल. तेव्हा मी पाच वर्षांची होते.जेव्हा मला शाळा आणि विद्यापीठांमध्ये बोलण्याची (भाषणाची) संधी मिळाली तेव्हा मी हा प्रसंग विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. यामुळे इतरांनाही अशा प्रसंगातून जावे लागले असेल तर त्यांना बळ मिळेल, त्यांनी स्वतःला दोष न देता मोकळेपणाने समोर येण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना त्या पाठीमागे होती.'
ऑटोबायोग्राफीमध्ये सलमानचा उल्लेख
सोमी अली सध्या ऑटोबायोग्राफी लिहित आहे, त्यात तिने सलमान खानवर एक प्रकरण लिहिले आहे. सोमी आणि सलमान यांच्यात तब्बल आठ वर्षे रिलेशनशिप होती. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. त्यानंतर 2000 मध्ये सोमी फ्लोरिडा येथे आली. सोमी सांगते, सलमानाचा मैने प्यार किया हा चित्रपट पाहिल्यानंतर मी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतात आले होते. ज्या दिवशी मी त्याचा चित्रपट पाहिला त्या रात्रीपासूनच मी त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगवत होते. दूसर्‍या दिवशी सकाळी मी उठल्याबरोबर भारतात जाण्याची तयारी करु लागले. कारण मला सलमानसोबत लग्न करायचे होते. हे माझ्या आईला कळाल्यानंतर ती नाराज झाली. मात्र नंतर ती तयार झाली आणि मी भारतात आले. त्यानंतर नंतर जे घडले तो इतिहास आता सर्वांसमोर आहे. सोमी केवळ सलमानची गर्लफ्रेंड नव्हती तर तिने त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
सलमानच्या हिंसेची झाली होती शिकार, तरीही केला त्याचा बचाव
असे बोलले जाते, की सलमानच्या तापट स्वभावाचा फटका सोमी अलीला बसला होता. मात्र, माध्यमांमध्ये जेव्हा बातम्या आल्या होत्या, की सलमानने सोमीच्या डोक्यात सॉफ्टड्रींकची बॉटल फोडली तेव्हा सोमीने समोर येऊन त्याचा बचाव केला होता. ती म्हणाली होती, जर सलमानने मला मारले असते तर रक्तबंबाळ होऊन मी हॉस्पिटलमध्ये पडलेली असते. मी प्रथमच दारु प्यायले होते. ते त्याला आवडले नाही म्हणून सलमानने कोल्डड्रिंक टेबलवर अडवे केले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत फोटो...