आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पतीला Kiss करत समांथाने साजरा केला नागार्जुनच्या मुलाचा B'Day

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्य 23 नोव्हेंबरला 31 वर्षांचा झाला आहे. यावेळी त्यांची पत्नी समांथाने केक कटींग करुन पतीला Kiss करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नागा चैतन्य आणि समंथाचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. लग्नानंतरचा नागा चैतन्यचा हा पहिला वाढदिवस आहे. समांथाने सोशल मीडियावर नागा चैतन्यला बर्थडे विश करताना लिहिले आहे, “Happy birthday my Everything I don’t wish , I pray every single day that God gives you everything your heart desires#happybirthdaychay” 

 

धाकट्या भावाने दिल्या अशा शुभेच्छा 
- नागा चैतन्यचा धाकटा भाऊ अखिल अक्किनेनी याने मोठ्या भावाच्या खांद्यावर चढून त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी नागाचा कजिन राणा दग्गुबकती, वडिल नागार्जुन, सुशांत ए, वेनेला किशोर आणि कुलप्रीत सिंह यांनीही नागाला शुभेच्छा दिल्या. 

 

6 ऑक्टोबरला झाले समांथासोबत लग्न 
- नागा चैतन्य आणि समांथा यांचे गेल्या महिन्यात 6 ऑक्टोबरला लग्न झाले. हिंदी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न झाले. नागा हिंदी तर समांथा ख्रिश्चन असल्याने दोन्ही रिती-रिवाजांनुसार त्यांनी लग्न केले होते. या लग्नाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे अनेक बडे चेहरे उपस्थित होते. 12 नोव्हेंबरला नागार्जुनने मुलाच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...