आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागार्जुनच्या सूनेने शेअर केले हनीमूनचे फोटोज, बॅकवर दिसले मिसेज अक्किनेनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबादः साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा सध्या हनीमून ट्रिपवर आहेत. अलीकडेच समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हनीमून ट्रिपचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत समांथा पाठमोरी दिसत आहे. व्हाइट नाइटी तिने परिधान केली असून त्यावर मिसेज अक्किनेनी असे लिहिले दिसत आहे. 6 ऑक्टोबर रोजी  हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न झाले. नागा चैतन्य हिंदू तर समांथा ख्रिश्चन कुटुंबातून आहेत. 

हैदराबादमध्ये  येथे होणार आहे रिसेप्शन.. 
- नागा आणि समांथाच्या लग्नाचे रिसेप्शन हैदराबाद येथे होणार आहे. यावेळी समांथा क्रेशा बजाजने डिझाईन केलेला लहंगा घालणार आहे.
- रिपोर्ट्सनुसार, हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाल्यानंतर दोघांचे चेन्नईत रिसेप्शन झाले होते. नागा चैतन्यची आई लक्ष्मी चेन्नईत वास्तव्याला आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलासाठी येथे ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते. आता नागार्जुन हैदराबाद येथे आणखी एक रिसेप्शन ठेवणार आहेत. 

मुलाच्या लग्नात मनसोक्त थिरकले होते नागार्जुन..
- मुलाच्या लग्नात नागार्जून यांनी मनसोक्त एन्जॉय केले. त्यांच्यासोबत वेंकटेश दग्गुबती हेसुद्दा डान्स करताना दिसले.
- डान्सवेळीचा फोटो नागार्जून यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मिशीवीना दिसले होते नागार्जुन...
- नागार्जुन यांना नेहमीच मिशीमध्ये पाहिले आहे पण मुलाच्या लग्नात त्यांच्या विनामिशीच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले. 
- तर चैतन्य आणि समांथाच्या लग्नात राणा दग्गुबतीची फॅमिली, वेंकटेश, सुरेश बाबू, राहुल रविन्द्रन, वाइफ उपासनासोबत रामचरण तेजा, वेन्नेला किशोर, सुशांत, अदिवि सेश या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

पाठवणीच्या वेळी समांथाला कोसळले होते रडू...
- लग्न मग ते सामान्य तरुणीचे असो किंवा सेलिब्रिटीचे... माहेरच्या आठवणी प्रत्येक मुलीच्या मनात दाटून येतात. अशावेळी आईवडिलांना सोडून सासरी जात असताना नववधूला आपल्या भावना आवरणे कठीण होऊन बसते.
- असचे काहीसे समांथाच्या बाबतीतही घडले. पाठवणीच्या वेळी समांथाला रडू कोसळले होते. तिचे चेह-यावरचे हसू आणि रडू अशा संमिश्र भावना यावेळी फोटोग्राफरनी त्यांच्या कॅमे-यात कैद केल्या होत्या.

लग्नानंतर समांथाने बदलले नाव...
- लग्नानंतर समांथाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर तिचे आडनाव बदलून अक्किनेनी असे केले. - समंथाने आडनाव बदलल्यानंतर ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनेकांनी तिचे कौतुक केले. - काहींनी ‘आडनाव बदलून भारतीय संस्कृतीसाठी तुझ्या मनात असलेला आदर दाखवलास,’ अशी कमेंट केली.

 लग्नात झाला 10 कोटींचा खर्च...
- दोन दिवस झालेल्या या विवाह सोहळ्यात जवळपास 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
-  हनीमूननंतर समंथा आणि नागा चैतन्य दोघेही आपापल्या कामात व्यग्र होतील.
- समंथाचा ‘राजू गारी गांधी 2’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे तर नागा चैतन्य त्याच्या आगामी ‘सव्यसाची’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होईल.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, समांथाने शेअर केलेले खास फोटोज..
 
बातम्या आणखी आहेत...