Home »News» Samantha Ruth Prabhu Hot Photo Shoot

सुपरस्टार नागार्जुनच्या सूनेचे बोल्ड फोटोशूट, शेअर केले PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 15:03 PM IST


एन्टरटेन्मेंट डेस्कः दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने अलीकडेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. 'JFW' मॅगझिनच्या जुलै महिन्याच्या अंकासाठी समांथाने हे फोटोशूट केले असून यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक लक्ष वेधून घेतोय. विविध अँगलने केलेल्या या शूटचे फोटोज समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोजना तिने कॅप्शन दिले, 'When you wear something made by a person there is something special there @jfwmagazine'. समांथा ही दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांची भावी सून आहे. नागार्जुन यांचा मुलगा चैतन्यसोबत येत्या 6 ऑक्टोबर रोजी समांथाचे लग्न होणार आहे.

40 दिवस हनीमून साजरा करणार आहेत समांथा आणि चैतन्य
- मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने होणार आहे. या लग्नाचा कार्यक्रम गोवामध्ये तीन दिवस चालणार आहे. यानंतर समांथा आणि नागा 40 दिवसांच्या हनीमूनवर जाणार आहेत.
- समांथा आणि चैतन्य हे दोघेही ट्रॅवलिंगचे शौकीन आहेत आणि लग्नानंतर फिरणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे.
- हे दोघे त्यांचा बहुतेक वेळ न्यूयॉर्कमध्ये घालवणार आहेत. येथेच समांथाच्या 'ये माया चेसावे' (2010) चित्रपटाचे शूटिंग झाले होते.
- हनीमूनवरुन परतल्यानंतर समांथा शिवकार्तिकेयन यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे.
- समांथा यावर्षी 'राजू गरी गढी 2' मध्येही दिसणार आहे. यात सासरे नागार्जूनही तिच्यासोबत काम करत आहेत. 2015 साली आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, समांथाच्या शूटचे 6 फोटोज...

Next Article

Recommended