आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात हा रियल लाईफ पहिलवान साकारणार 'खशाबा जाधव'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताला पहिले वैयक्तिक औलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राच्या मातीचे सुपुत्र दादासाहेब जाधव म्हणजेच खशाबा जाधव यांची भूमिका संग्रामसिंह करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल खशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढत आहेत. त्यात संग्राम त्यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. संग्राम बिग बॉसच्या सातव्या सिझननंतर चर्चेत आला होता. 

भारतासाठी पदक मिळवणारे पहिले 
- खशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. 
- फिनलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत जाधव यांनी ही कामगिरी केली होती. 
- देशासाठी वैयक्तिक पदक मिळवणारे खशाबा जाधव हे पहिलेच होते. 
- ऑलिम्पिक पदक मिळवल्यानंतर मात्र खशाबा जाधव हे विस्मृतीत गेले. 

संग्रामचा दुसरा चित्रपट.. 
- संग्रामसिंग राजपूत याचा हा दुसरा चित्रपट असणार आहे.
- संग्राम यापूर्वी 2012 मध्ये आलेल्या 'व्हॅलेन्टाइन नाइट'मध्येही मुख्य भूमिकेत होता. 
- चित्रपटासाठी बॉडीवर काम करायला सुरुवात केल्याचे संग्रामने सांगितले. 
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील एक टिचर संग्रामला ट्रेनिंग देत असल्याचेही समोर आले आहे. 
- संग्रामने या चित्रपटासाठी 6 किलो वजन कमीही केले आहे. मात्र त्याला अजून दहा किलो वजन कमी करायचे आहे.