आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने लावले गंभीर आरोप, आपबीती ऐकवताना संजय दत्तच्या भावाला कोसळले रडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी साहिला आणि मुलगी अनुसूयासोबत निमाई बाली. (इनसेटमध्ये संजय दत्त) - Divya Marathi
पत्नी साहिला आणि मुलगी अनुसूयासोबत निमाई बाली. (इनसेटमध्ये संजय दत्त)
मुंबईः अभिनेता संजय दत्तचा आते भाऊ आणि अभिनेता निमाई बालीचे वैवाहिक आयुष्य अडचणीत सापडले आहे. एकीकडे प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज निमाईची पत्नी आणि अभिनेत्री साहिला चड्ढासोबत तिच्या आराम नगरस्थित घरी वास्तव्याला आहे. तर दुसरीकडे निमाईला मात्र स्वतःचे घर सोडून गोरेगावच्या एका फ्लॅटमध्ये राहावे लागतंय. निमाईची पत्नी साहिलाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. साहिलाच्या म्हणण्यानुसार, निमाईने त्याच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत निमाईने आपबीती सांगताना हा आरोप खोटा असल्याचे सांगितले आहे. 

निमाई म्हणाला, मुलीत अडकला आहे माझा जीव...
- निमाईने मुलाखतीत म्हटले, "अखेर कधीपर्यंत माझ्या संयमाची परीक्षा घेतली जाणार आहे? माझे घर सोडून मला दहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झआला आहे. मी अक्षरशः रस्त्यावर आलोय. ती असे का करतेय, खरंच मला कळत नाहीये?"
- "मी मुलीला जीवे मारु शकतो, असे साहिला म्हणूच कशी शकते. अनुसूया माझा जीव आहे, या जगात तिच्यापेक्षा दुसरे जास्त काहीच माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आज मी जिवंत आहे, ते केवळ तिच्यासाठीच."
- "राहुल राजमुळे मला माझे घर सोडावे लागले आहे. मी साहिलाला राहुलला पाठिंबा देऊ नको, म्हणून ब-याच काळापासून सांगतोय. पण तो माझा भाऊ आहे, मी त्याला सपोर्ट करतच राहणार, असे साहिला म्हणत असते." 
- "मी सुद्धा ब-याचदा राहुलला पाठिंबा दिला आहे. अशा व्यक्तीला मदत केल्याचे हेच फळ मिळते, असे मी आता म्हणेल."

साहिलाने निमाईवर लावला मारहाण केल्याचा आरोप...
- जेव्हा निमाईने राहुलला त्याच्या घरी राहण्याला विरोध दर्शवला तेव्हा साहिलाने तिची मुलगी अनुसूया आणि शेजा-यांना निमाई तिला मारहाण करत असल्याचे सांगितले.
- त्यानंतर त्यांच्या घरातून घरगुती हिंसेच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर कंटाळून निमाईने घर सोडले आणि तो गोरेगाव येथे शिफ्ट झाला. 
- जेव्हा निमाईला याविषयी विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला, "मी फक्त एवढेच सांगेल, की माझे माझ्या पत्नी आणि मुलीवर खूप प्रेम आहे. मी सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय."

पुढील स्लाईडवर वाचा, राहुल राज आणि पत्नी साहिलाच्या नात्याविषयी काय म्हणाला निमाई...
बातम्या आणखी आहेत...