आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरोल संपला, संजय तुरुंगात जाताना भावूक झाली पत्नी, चिमुकलीने दिला \'बाबा\'ला निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा 30 दिवसांचा पॅरोल संपला असून तो मुंबईहून पुण्यातील येरवाडा तुरुंगाकडे शनिवारी रवाना झाला. पुण्याच्या दिशेने निघण्यापूर्वी संजय दत्तने पत्नी मान्यता आणि मुले इकरा-शाहरान यांची भेट घेतली. यावेळी संजूबाबा भावूक झालेला दिसला.
संजय दत्त 26 ऑगस्ट रोजी मुलगी इकराच्या नाकाच्या सर्जरीसाठी 30 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी पाच वर्षांचा तुरुंगवास भोगत आहे.
या प्रकरणी त्याने 18 महिन्यांची शिक्षा आधीच भोगली होती. मार्च 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला उर्वरित शिक्षेसाठी तुरुंगात पाठवले. बातम्यांनुसार, यावर्षाच्या अखेरपर्यंत संजय दत्त तुरुंगातून कायमचा बाहेर पडू शकतो.
पुढे पाहा, पुण्यासाठी रवाना होण्यापूर्वी पत्नी आणि मुलांना भेटतानाची संजयची छायाचित्रे...