आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt May Be Released From Jail In December

पत्नी मान्यता म्हणाली, 'संजय डिसेंबरमध्ये तुरुंगातून सुटणार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- संजय दत्त)

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला आरोपी अभिनेता संजय दत्त डिसेंबरमध्ये सुटण्याची शक्यता आहे. संजयची पत्नी मान्यता दत्तने ही माहिती दिली आहे. मान्यताने सांगितले, 'गेल्याच आठवड्यात येरवडा तुरुंगात जाऊन मी त्याला भेटले... त्याला भेटून आनंद झाला... सगळं काही सुरळीत पार पडलं तर डिसेंबरपर्यंत संजू घरी असेल.''
तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्त सिनेमांचे शूटिंग सुरु करणार आहे. राजकुमार हिराणी संजयसोबत एका सिनेमाचे प्लानिंग करत आहे. मात्र त्यापूर्वी संजय उमेश शुक्लाच्या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार असल्याचे समजते. 'ओ माय गॉड' या सिनेमाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला सध्या अभिषेक बच्चनसोबत 'ऑल इज वेल' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करतोय. उमेशच्या आगामी सिनेमात संजय हीरोच्या भूमिकेत असेल.
करण मल्होत्राच्या 'शुद्धी' या सिनेमात संजय व्हिलनच्या भूमिकेत झळकणार असल्याचीही बातमी होती. करणच्या अग्निपथ या सिनेमात संजयने कांचा ही खलनायकी भूमिका साकारली होती. मात्र संजयने शुद्धीसाठी नकार दिला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर निगेटिव्ह रोल करायची संजयची इच्छा नाहीये.
सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा त्याने आधीच भोगलेली असल्याने उर्वरीत साडेतीन वर्षांच्या शिक्षेसाठी त्याला येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आता मान्यताने तो डिसेंबरमध्ये सुटेल अशी आशा व्यक्त केल्यानं पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे.