मुंबईः गुरुवारी संजय दत्त, सलमानची बहीण अर्पिताची भेट घेण्यासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. येथे त्याने अर्पिता आणि तिचे नवजात बाळ आहिलची भेट घेतली. सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांनादेखील यावेळी हॉस्पिटलबाहेर पडताना बघितले गेले. सोहा अली खान हिनेदेखील अर्पिताची भेट घेऊन तिला शुभेच्छा दिल्या. अर्पिताने ३० मार्च रोजी बाळला जन्म दिला. त्यानंतर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी अर्पिताची भेट घ्यायला हॉस्पिटलमध्ये येत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हॉस्पिटलबाहेर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...