आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच सलमानबरोबर पुन्हा झाली आहे का संजय दत्तची मैत्री, पाहा काय दिले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एक अशी वेळ होती, जेव्हा बॉलिवूडमध्ये संजय दत्त आणि सलमान यांच्या मैत्रीचे दाखले दिले जात होते. पण काळाबरोबर त्यांच्या मैत्रीला तडा गेल्याचे मीडियातून समोर आले. काही दिवसांपूर्वी संजय दत्त आणि सलमान खान अंबानींच्या घरी गणेशोत्सवादरम्यान भेटले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर पुन्हा या दोघांच्या मैत्रीच्या चर्चांना सुरुवात झाली. नुकतेच संजय दत्तने एका मुलाखतीत त्याच्या सलमानबरोबरच्या मैत्रीबाबत बरेच काही सांगितले. 

मी आणि सलमान रोज तर भेटू शकणार नाही.. 
संजय दत्तला नुकतेच एका मुलाखतीत सलमानबाबत विचारले होते, त्यावर संजूबाबा म्हणाला - आमच्यात काहीही बिघडलेले नाही. केवळ मीडियाला तसे वाटत राहते. सलमान नेहमीच माझा भाऊ राहील. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. लोक आमच्या मैत्रीचा इश्यू का करतात हेच मला कळत नाही. मी आणि सलमान रोज तर भेटू शकणार नाही ना. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, सलमानबरोबर पॅचअपबाबत काय म्हणाला संजय दत्त...

भांडणच नाही तर पॅचअप कसले..
आम्ही दोघे अॅक्टर आहोत. तो त्याच्या कामात व्यस्त आहे आणि मी माझ्या. त्यामुळे आम्ही नेहमी तर भेटू शकत नाही. पण आमच्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर कायम असतो. आमचे भांडणच झालेले नाही तर पॅचअपचा प्रश्न येतोच कुठे. तो अंबानीच्या पार्टीत आला आणि मी जात होतो, त्याचवेळी रस्त्यावर आमची भेट झाली आणि गळाभेट घेतली, कारण तसे केल्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. 
 
अशा आल्या वादाच्या बातम्या.. 
- 2011 मध्ये सलमानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटासाठी संजय दत्तला वडिलांची भूमिका ऑफर झाली होती. पण तेव्हा संजय दत्त म्हणाला होता की, मी अद्याप एवढा वयस्कर झालेलो नाही की, वडिलांची भूमिका करेल. 
- त्यानंतर 2016 मध्ये एका रॅपिड फायर प्रश्नात त्याला विचारले की सलमानला एका शब्दात कसे वर्णन करणार, तेव्हा त्याने अॅरोगंट(अहंकारी) असे उत्तर दिले होते. 

तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्तला भेटायला गेला नव्हता सल्लू 
फेब्रुवारी 2016 मध्ये संजय दत्त तुरुंगातून सुटल्यानंतर सलमान त्याला भेटायला गेला नव्हता. संजय दत्त सुटण्यापूर्वी अशा चर्चा होत्या की, त्याला आरामात काही दिवस राहता यावे म्हणून सलमानने फार्म हाऊसवर खास व्यवस्था केली आहे. तसेच सलमान पार्टी देणार असेही म्हटले जात होते. पण असे काहीही झाले नाही. त्याबाबत विचारले तेव्हा सलमानने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मला पार्टी दिली नाही किंवा मला भेटलाही नाही, असे संजय दत्त म्हटला होता. 
 
अनेक चित्रपटांत केले एकत्र काम 
- सलमान खान हा संजय दत्तच्या अगदी जवळच्या लोकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. 
- दोघांनी 'साजन', 'दस' (अनरिलीज्ड), 'चल मेरे भाई' आणि 'सन ऑफ सरदार' मध्ये एकत्र काम केले आहे. 
 
बिग बॉस-5 मध्येही दिसले एकत्र 
- त्याशिवाय संजय दत्त आणि सलमान खान रियालिटी शो 'बिग बॉस'च्या पाचव्या सिझनमध्येही एकत्र दिसले होते. 
- तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजय दत्त म्हणाला होता की, सलमानने त्याच्यापेक्षा मोठे व्हावे अशी त्याची इच्छा आहे. 
बातम्या आणखी आहेत...