आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर बिकिनी फोटो पाहून पत्नीवर भडकला संजय दत्त, वाचा काय म्हणाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्यता दत्तने बिकिनी फोटो शेअर केल्यामुळे नाराज आहे संजय दत्त. - Divya Marathi
मान्यता दत्तने बिकिनी फोटो शेअर केल्यामुळे नाराज आहे संजय दत्त.
एंटरटेनमेंट डेस्क - 'भूमी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा संजय दत्त सध्या त्याची पत्नी मान्यतावर नाराज असल्याचे समजत आहे. मान्यताने सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेयर केल्याने तो नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. या मुद्द्यावरून त्याने मान्यताला सुनावले असल्याचेही समजत आहे. गेल्या काही महिन्यात मान्यताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक बिकिनी फोटो आणि हॉट फोटो शेयर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने वन शोल्डर रेड बिकिनी फोटोही शेयर केला होता. त्यामुळे बी टाऊनमध्ये चांगलीच चर्चा झाली. या सर्वामुळे संजय दत्त अडचणीत येत असल्याची माहिती मिळत आहे. त्याने मान्यताला असे फोटो पोस्ट करण्यास मनाई केल्याचे समजत आहे. 

मित्राने सांगितले संजयला.. 
रिपोर्ट्सनुसार एका मित्राने संजय दत्तला मान्यताच्या फोटोबाबत चर्चा होत असल्याचे सांगितले. अशाप्रकारचे फोटो शेयर करणे योग्य नसल्याचेही त्या मित्राने सांगितल्याचे समजत आहे. वृत्तानुसार मान्यता फिल्ममेकर्सना आकर्षित करण्यासाठी हे सर्व करत आहे. तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा करिअर सुरू करायचे आहे. पण हाती आलेल्या माहितीनुसार घरातील महिलांनी चित्रपटांत काम करावे असे संजयला कधीही वाटणार नाही. त्याची मुलगी त्रिशालाने जेव्हा या क्षेत्रात यायची इच्छा व्यक्त केली तेव्हाही संजय म्हणाला होता की, तिने असा विचार केला तरी तिचे पाय तोडून टाकेल. एका मुलाखतीत तो असे म्हणाला होता. 

मान्यताने मुलांबरोबर सुटीवर गेल्यानंतर हे आणि यासह इतर काही फोटो पोस्ट केले होते.. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मान्यताने शेयर केलेले काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...