आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt With His Family During Ganpati Visarjan

पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेल्या संजूबाबाने साजरा केला गणेशोत्सव, दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेल्या अभिनेता संजय दत्तने आपल्या कुटुंबासोबत यंदाचा गणेशोत्सव साजरा केला. संजयच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतात. पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलांसोबत त्याने दीड दिवस श्रींची मनोभावे पूजा केली.
शुक्रवारी खार (मुंबई) येथील बीएमसी शाळेत तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात त्याने आपल्या बाप्पाचे विसर्जन केले. विसर्जनापूर्वी पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत संजय दत्तने बाप्पाची पूजा आणि आरती केली.
संजय दत्त 26 ऑगस्टपासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. 30 दिवसांसाठी त्याला तुरुंगातून सुटी देण्यात आली आहे. या पॅरोलसाठी त्याने मुलीच्या शस्त्रक्रियेचे कारण दिले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, संजय दत्तच्या श्रींच्या विसर्जनाची खास छायाचित्रे...