मुंबई : बॉलिवूडअभिनेत्री करिश्मा कपूर हिने माझ्याशी लग्न करताना पैशाचा विचार केला. तिने केवळ पैशासाठीच माझ्याशी लग्न केले, असा आरोप संजय कपूरने केलाय. संजय कपूरने बांद्रा कौटुंबिक न्यायालयात नव्याने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत हा दावा केला आहे.
अभिषेक बच्चनबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर करिष्माने 2003 मध्ये दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर बरोबर विवाह केला होता. संजयने दाखल केलेल्या याचिकेमध्ये 11 वर्षांचा वैवाहिक नाते संपुष्टात येण्यासाठी करिष्माला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्नी, सून म्हणूनचे नव्हे तर, आई म्हणूनही करिष्मा अपयशी ठरल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. त्यांना दोन मुले आहेत. समायरा आणि कियान. त्यांच्या ताब्याचा मुद्दा कोर्टात सुरु आहे. संजनने दावा केलाय की, करिश्मा मुलांचा वापर करत आहे. कारण माझ्याकडून जास्त पैसे उकळायचे आहेत. माझ्या आजारी वडिलांना भेटण्यापासून मुलांना परावृत्त केलेय. त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होईल.
करिष्माला मी दिल्लीत येऊन माझ्यासोबत रहाण्यास सांगितले पण तिने माझ्याऐवजी तिच्या करीयरला प्राधान्य दिले आणि आज ती मुंबईत रहात आहे असे संजयने याचिकेत म्हटले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करिश्मा-संजय आणि त्यांच्या दोन्ही मुलांची छायाचित्रे...